पावसाळी अधिवेशनाते दोन्ही दिवस वादळी ठरले. भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबनानंतर मंगळवारी भाजपा आमदारांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि विधीमंडळाच्या आवारात अभिरूप विधानसभा सुरु केली होती. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत माईक व स्पीकर जप्त करण्यास सांगितल्यानंतर पत्रकार कक्षात हे कामकाज सुरु झाले. त्यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर बोलताना भाजपा आमदार नितेश राणे यांचा तोल गेला. मंगळवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भरविण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत बोलताना मी बाळासाहेबांचा नातू आहे का नाही हे सांगू शकत नाही असे म्हणत यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं.

यानंतर मुंबईत त्याचे पडसाद उमटले असून शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात या वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. नितेश राणेच्यां विरोधात मुंबईत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्यानंतर नितेश राणेंनी ‘भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो’ असं ट्विट करण्यात केलं आहे.

काय म्हणाले होते नितेश राणे?

सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना नितेश राणे आक्रमक झाले. आदित्य ठाकरेंचा आवाज काढत त्यांनी मी बाळासाहेबांचा नातू आहे का नाही हे सांगू शकत नाही असे म्हणत यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल असे म्हटले होते.

नितेश यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक

नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर मुंबईतील शिवसैनिक जोरदार आक्रमक झाले आहेत. नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा देखील जाळण्यात आला. यादरम्यान पोलीस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. नितेश राणे यांनी माफी मागावी आणि इथून पुढे बोलताना तोंड सांभाळून बोलावं अशी मागणी शिवसैनिकांमार्फत करण्यात आली.

नितेश राणेंची ट्विट करत दिले स्पष्टीकरण

विधानसभेबाहेरील माझ्या कालच्या भाषणामध्ये मी आदित्य ठाकरेबद्दल उल्लेख केला होता तो बर्‍याच जणांनी चुकीच्या पद्धतीने घेतला. जर याने एखाद्याच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. या निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कोणत्याही कामकाजात भाजपा आमदारांनी सहभाग घेतला नाही. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसूनच भाजपा आमदारांनी सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. यावेळी भाजपने प्रतिविधानसभा भरवली होती. त्यात भाषण करत असताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती