‘मी कशातून निवृत्ती घ्यावी? एक कलाकार निवृत्त कसा होऊ शकतो? माझी नियुक्ती ही सरकारने केली असून, सरकार ज्या काही सूचना देईल त्याच मी पाळेन.’ असे म्हणत पदाचा राजीनामा देणार नसल्याचे एफटीआयआयचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या महिनाभरापासून एफटीआयआयचे विद्यार्थी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्ती विरोधात आंदोलन करत आहेत. कलेच्या क्षेत्रात वैभवशाली परंपरा लाभलेल्या या संस्थेच्या अध्यक्षपदी पात्र व्यक्तीचीच निवड व्हावी, अशी इच्छा विद्यार्थ्यांची आहे. तसेच, अभिनेते अनुपम खेर, ऋषी कपूर, अमोल पालेकर यांनीही विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवित चौहान यांना विरोध दर्शविला होता. त्यावर ” मी ‘एफटीआयआय’च्या चेअरमनपदाचा राजीनामा देणार नाही. मला याबात सल्ला देणारे अनुपम खेर आणि ऋषी कपूर कोण आहेत ?” असा पवित्रा गजेंद्र चौहान यांनी घेतला.
दरम्यान, ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्याचा सरकारचा निर्णय पूर्णपणे योग्य नव्हता. मात्र आता सरकार एकदा घेतलेल्या निर्णयापासून माघार घेऊ शकत नसल्याची कबुली खुद्द माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटलींनी आपल्यासमोर दिली होती, असा गौप्यस्फोट ऑस्कर विजेता रसुल पोकुट्टी याने शुक्रवारी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा