मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने प्रवास करताना वाईट अनुभव आला आहे. हा अनुभव त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तसेच ब्रिटिश एअरवेजची तक्रार केली आहे. ब्रिटिश एअरवेजने ओव्हरबुकिंग्सचं कारण देत प्रीमियम क्लास सीटचं बुकिंग केलेलं असूनही भिडे यांना इकोनॉमी क्लासमधून प्रवास करायला लावला. त्यामुळे भिडे संतापल्या. त्यांनी त्यांचा संताप एक्सवर एक पोस्ट करून व्यक्त केला आहे. तसेच भिडे यांनी दावा केला आहे की, ब्रिटिश एअरवेजच्या प्रवाशांना असे अनुभव नेहमीच येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अश्विनी भिडे यांच्याकडे प्रीमियम क्लासचं तिकीट होतं. परंतु, ब्रिटिश एअरवेजने ओव्हरबुकिंग्सचं कारण देत अश्विनी भिडे यांना इकोनॉमी क्लासमधून प्रवास करायला लावला. त्यामुळे भिडे यांनी ब्रिटिश एअरवेजवर भेदभाव करण्याचा, तसेच ते वर्णद्वेष करत असल्याचा आरोप केला आहे.भिडे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ब्रिटिश एअरवेजला उद्देशून म्हटलं आहे की, तुम्ही लोकांची फसवणूक, भेदभाव किंवा वर्णद्वेष करता का? कुठलीही भरपाई न देता ओव्हबुकिंग्सच्या खोट्या सबबी सांगून चेक इन काउंटरवर प्रीमियम इकोनॉमी तिकीट काढलेल्या प्रवाशाला ऐनवेळी इकोनॉमी सीटवरून प्रवास करायला लावता. ब्रिटिश एअरवेज प्रवाशांबरोबर नेहमी अशीच वागते का?

प्रीमियम क्लासऐवजी इकोनॉमी क्लासमधून प्रवास करायला लावल्यानंतर ब्रिटिश एअरवेजने भरपाईदेखील दिली नसल्याचा आरोप अश्विनी भिडे यांनी केला आहे. भिडे म्हणाल्या, तुम्ही डीजीसीएच्या (Directorate General of Civil Aviation) नियमांचे उल्लंघन करता असं ऐकलं होतं, मला यावेळी ते पहिल्यांदाच जाणवलं. दरम्यान, अश्विनी भिडे यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टद्वारे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे ब्रिटिश एअरवेजची तक्रार केली आहे.

हे ही वाचा >> VIDEO : प्रचंड गर्दीत नुसती घोषणा ऐकून शरद पवारांनी कार्यकर्त्याला ओळखलं; आमदार म्हणाले, “स्मरणशक्तीला सलाम!”

इतर प्रवाशांचा संताप

दरम्यान, भिडे यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करून ब्रिटिश एअरवेजमधून प्रवास करताना आलेले वाईट अनुभव शेअर केले आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, मी एकदा मुंबईवरून लंडनला जात होतो. त्यासाठी मी बिझनेस क्लासचं तिकीट काढलं होतं. परंतु, ऐनवेळी मला प्रीमियम इकोनॉमी क्लासमध्ये हलवण्यात आलं. या घटनेला अनेक महिने उलटले तरी ब्रिटिश एअरवेजने मला भरपाई दिलेली नाही.