सरकारी योजनांच्या माध्यमातून मिळालेली घरे आयएएस, आयपीएस अधिकारी परस्पर भाडय़ाने देतात, याची चौकशी केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत केली.  मीरा हौसिंग सोसायटीमध्ये उघडकीस आलेल्या सेक्स रॅकेटबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान पाटील यांनी ही घोषणा केली. मीरा गृहनिर्माण सोसायटीने बाजारभावाने ही जमीन म्हाडाकडून घेतली आहे.
मात्र, ज्या फ्लॅटमध्ये हा प्रकार उघडकीस आला तो फ्लॅट म्हाडाची परवानागी न घेता एका कंपनीला भाड्याने देण्यात आला होता. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याच्या म्हडास सूचना देण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Story img Loader