सनदी अधिकाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता यंदा केंद्र सरकारने प्रथमच भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकाऱ्यांचे संख्याबळ विक्रमी १८० पर्यंत एवढे वाढविले आहे. राज्यातील अधिकाऱ्यांच्या मोठय़ा प्रमाणावर रिक्त असलेल्या जागा लक्षात घेता संख्याबळ अधिक वाढवावे, ही महाराष्ट्राची मागणी मात्र मान्य होणार नाही. गतवर्षांच्या तुलनेत संख्याबळ फार तर एकाने वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेत (आय.ए.एस.) १८० तर भारतीय पोलीस सेवेत (आय.पी.एस.) १५० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत १९९१ पूर्वी दरवर्षी १०० ते १२० अधिकाऱ्यांची नेमणूक केली जायची. १९९१ मध्ये देशात आर्थिक उदारीकरणाचे धोरण आखण्यात आले. परिणामी अधिकाऱ्यांची एवढी गरज भासणार नाही, असा युक्तिवाद तत्कालीन कार्मिक खात्याचे राज्यमंत्री व विद्यमान वित्तमंत्री पी. चिंदम्बरम यांनी केला होता. त्यानुसार प्रत्येक वर्षी अधिकाऱ्यांची संख्या घटत गेली. २००० मध्ये सर्वात कमी म्हणजे अवघे ५४ अधिकारी सेवेत दाखल झाले होते. तेव्हा आर्थिक सबब तत्कालीन भाजप सरकारने पुढे केली होती. अधिकाऱ्यांची चणचण भासू लागल्याने २००४ नंतर संख्याबळ वाढविण्यात आले. २००८ मध्ये १११ अधिकारी सेवेत दाखल झाले होते. गेल्या वर्षी १५१ अधिकाऱ्यांची नेमणूक झाली होती. सर्वच राज्यांमध्ये सनदी अधिकाऱ्यांची चणचण भासत असल्याने यंदा आय.ए.एस. अधिकाऱ्यांचे संख्याबळ वाढविण्यात आले.
महाराष्ट्रातील संख्याबळ कायम
राज्यात आय.ए.एस. अधिकाऱ्यांची ३५० पदे मंजूर असली तरी सध्या २८० अधिकारी सेवेत आहेत. म्हणजेच मंजूर जागांच्या तुलनेत ७० अधिकाऱ्यांची कमतरता आहे. गतवर्षी राज्याच्या सेवेत आठ अधिकारी दाखल झाले होते. रिक्त जागांचे प्रमाण लक्षात घेता हे संख्याबळ दरवर्षी १२ ते १४ करावे, अशी महाराष्ट्राची भूमिका होती. पण केंद्राने ती मान्य केलेली नाही.
देशातील सनदी अधिकाऱ्यांची संख्या वाढल्याने राज्याच्या कोटय़ातील अधिकाऱ्यांची संख्या एक किंवा दोनने वाढण्याची शक्यता आहे. यंदा नऊ किंवा दहा अधिकारी राज्याच्या सेवेत दाखल होतील, असा अंदाज आहे. राज्याच्या सेवेतील ४० टक्के अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर असावेत, असे प्रमाण केंद्राने निश्चित केले आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या सेवेतील ७६ अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर असणे आवश्यक असले तरी सध्या ३८ अधिकारीच केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.
‘यूपीएससी’मध्ये ठाण्यातील तिघे यशस्वी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय प्रशासकीय सेवा स्पर्धा परीक्षेत ठाण्यातील चिंतामणी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील तिघे यशस्वी झाले आहेत. चिन्मय पाटील (८०७), डॉ. पराग गवळी (५४६) आणि आदित्य प्रभुदेसाई (५१८) अशी तिघा यशस्वीतांची नावे आहेत. आदित्य प्रभुदेसाई गेल्या वर्षीही परीक्षा उत्तीर्ण झाले होते. सध्या नागपूरात आयकर विभागात कार्यरत आहेत.  

राज्यातील गुणवंतांची यादी
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये महाराष्ट्र राज्यातील यशस्वी उमेदवार आणि त्यांचे अखिल भारतीय स्तरावरील गुणानुक्रमांक पुढीलप्रमाणे
१५ – वदिवेगावकर कौस्तुभ
२९ – आग्रे क्षिप्रा सूर्यकांतराव
४७ – पट्टनशेट्टी रवी सुभाष
९८ – जोशी मृण्मयी शशांक  
११३ – राऊत अभिजित राजेंद्र  
१२६ – सुमन पेन्न्ोकर
१३० – निरगुडे योगेश बबनराव
१४५ – पंडित चिन्मय सुरेश  
१७० – सावंत स्वप्निल राजाराम  
१७६ – कुलंगे विजय अमृता
१९७ – अभिषेक महाजन
२०४ –  देशपांडे नेहा दीपक
२०६ – गायकवाड विनोदकुमार दामोदर
२३८ – सुतार संजयकुमार रचप्पा  
२३९ – पंडित महेंद्र कमलाकर
२४८ – ठुबे प्रतीक विजयकुमार
२५३ – नागपुरे अमोद अशोक
३०० – पुगलिया चंदन राजेंद
३०३ – शिंदे मंगेश पोपटराव
३०५ – वाघे प्रसादराव अण्णासाहेब
३०६ – कार्तिकेयन डी  
३१७ – दराडे शरद भास्कर
३३२ – स्वामी हरेश्वर विश्वनाथप्पा
३३५ – वैभव माधवराव ढेरे  
३५९ –  वाकारे योगेंद्र तुकाराम
३७२ – पांडे मोनिका हर्षद
३९० – गोसावी हर्षित पृथ्वीराज
४४५ – भारत लक्ष्मण मरकड
४४८ – दातार प्रसन्ना प्रमोद
४६९- पतंगे वैशाली शामराव
४७७ – शेळके रत्नाकर भीमराव
४८७ – गिरी कौस्तुभ संदीप
५१४ – शितोळे सतीश विश्वनाथ
५१५ – जाधव प्रिया रत्नाकर
५१८-  प्रभुदेसाई आदित्य दिवाकर
५३२ – यादव विश्वजित शिरीषकुमार
५३४ – मेहेरे योगेश प्रभाकरराव
५३८ – काळे अजिंक्य अजेय
५४६ – गवळी पराग हर्षद
५५३ – अखिल मल्लिकार्जुन शास्त्री
५८२ – वैष्णव विपिन वासुदेव
६०० – पखाले हेमंत सुधाकर
६०४ – पाटील यतिष गजानन
६४३ – संदीप विश्वनाथ सोनटक्के
६४७ – शर्मा तृप्ती सुभाष
६५७ – रासकर सौरभ सूर्यभान
६६४ – मोघे ओंकार चंद्रशेखर
६९० – अलदार वैभवकुमार पांडुरंग
७०८ – तंगडकर दीपिका कार्तिक
७१३ – फाळके अभयसिंग जयसिंग
७१८ – कारखिले कैलास विनायक
७५८ – बदारखे सुमित देविदास
७६२ – पीयूषा प्रमोद जगताप
७७५ – भडाणे सचिन गुलाबराव
८०७ – पाटील चिन्मय प्रभाकर
८२३ – गव्हाळ नीतिन रामेश
८२८ – आगवणे सुनील किसन
८३६ – छत्रपती किरण खेमचंदभा
८४० – कांबळे मिनल मोहन
८५५ – अमितकुमार निकाळजे
८८६ – उके अश्विनकुमार धनरूप
९०७ – महेश चंद्रा सायनी
९०९  – साळुंके दुर्गेश यादव
९१४ – मुकेश कुमार ब्राह्मणे
९१९ – गोरसे प्रसाद दत्तात्रय
९३१  – लोटे विनीत बाबासाहेब
९४८ – राऊत मनीष महेंद्र
९५१ – शेटे मोतिलाल सहदेव
९६२ – चव्हाण प्रवीण मोहनदास
९८६ – पसाळे नागनाथ भीमराव
९९५ – जाधवर विश्वास हरिदास
९९८ – भापकर स्नेहल पुरुषोत्तम

chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Industrial production rises to six month high of 5 2 in November print eco news
देशाची कारखानदारी रूळावर येत असल्याची सुचिन्हे!  नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन सहा महिन्यांच्या उच्चांकी  ५.२ टक्क्यांवर
Bhabha Atomic Research Centre
नोकरीची संधी
GDP growth likely to be limited to 6 3 percent ​​State Bank print eco news
जीडीपी वाढ ६.३ टक्क्यांवरच मर्यादित राहण्याची शक्यता – स्टेट बँक
recession in grains market recession still hangs over agricultural economy
क कमॉडिटीचा – कडधान्य मंदीच्या विळख्यात
Indrayani river foams before Chief Minister Devendra Fadnavis visit to Alandi
इंद्रायणी पुन्हा फेसाळली; देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देणार का?
Ramdas Athawale Devendra Fadnavis Mayor post pune corporation
‘ उपमहापौर’ केले आता ‘ महापौर’ करा, रामदास आठवलेंची मागणी ! मंत्रीमंडळात स्थान देऊन देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळावा
Story img Loader