लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : चहाचे अधिक सेवन केल्यास रक्तदाब वाढतो, हृदयात अनियमितता येते. तसेच चहाचे सतत सेवन केल्यास लोहाची कमतरता निर्माण होते आणि अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे दुधाचा चहा टाळावा, असे ‘आयसीएमआर’ने संशोधनाअंती जाहीर केले आहे. त्यामुळे दुधाचा चहा पिण्याचे टाळावे, तसेच चहा व कॉफीचे सेवन कधी करावे याबाबत ‘आयसीएमआर’ने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात

भारतीय वैद्याकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय पोषण संस्थेने केलेल्या संशोधनामध्ये कॅफिनयुक्त पेयांमधील टॅनिन शरीरात लोह शोषण्यास अडथळा आणू शकतात. टॅनिन पोटातील लोहासाठी प्रतिरोधक असतात. त्यामुळे शरीरामध्ये लोहाची कमतरता व अशक्तपणासारखी स्थिती निर्माण होते. याव्यतिरिक्त, कॉफी आणि चहाचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढतो आणि ते हृदयाच्या अनियमिततेस कारणीभूत ठरते. ब्रूड कॉफीच्या १५० मिलीमध्ये ८० ते १२० मिलीग्रॅम कॅफिन असते, तर इन्स्टंट कॉफीमध्ये ५० ते ६५ मिलीग्रॅम इतके कॅफिन असते. त्याचप्रमाणे चहामध्ये ३० ते ६५ मिलीग्रॅम कॅफिन असते. कॅफिनचे सेवन जास्त प्रमाणात करणे घातक असल्याचे आढळले आहे. आयसीएमआरने जास्त प्रमाणात चहा, कॉफी सेवन करण्यापासून सावध केले.

आणखी वाचा-मुंबई : पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मोनोरेल गाडीची चाचणी सुरू

दुधाशिवाय चहा प्यायल्याने रक्त परिसंचरण सुधारते, कोरोनरी धमनी रोग आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो, असे आयसीएमआरने जाहीर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

१७ नवीन मार्गदर्शक तत्त्वे

  • आयसीएमआरने एनआयएनच्या माध्यमातून १७ नवीन आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यात चहा आणि कॉफीचे अधिक सेवन करणाऱ्यांना सावधानता बाळगण्याची शिफारस करण्यात आली आहे.
  • मार्गदर्शक तत्त्वांमधून वैविध्यपूर्ण आहार आणि सुदृढ राहण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले आहे. जेवणाबरोबर किंवा नंतर लगेच चहा, कॉफी आणि इतर कॅफिनयुक्त पेये घेणे टाळावे. जेवणापूर्वी आणि नंतर किमान एक तास आधी चहा पिणे टाळावे, असा सल्ला वैद्याकीय संस्थेने दिला आहे.