दहावी, बारावीचा राज्याचा निकाल ९९ टक्क्यांपेक्षा अधिक

‘काऊन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झाम’ मंडळाच्या दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी) परीक्षांचा घवघवीत निकाल लागला. राज्यातील दहावीचा निकाल ९९.८५ टक्के तर बारावीचा निकाल ९९.२७ टक्के लागला.

दहावीच्या परीक्षेत मुंबईतील जमनाबाई नरसी शाळेची जुही कजारिया देशात प्रथम आली. बारावीत मुंबईची मिहिका सामंत (९९.७५ टक्के) देशात दुसरी आली आहे.

आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षांचे निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाले. यंदा निकालातील चढाओढ अधिकच वाढली आहे. दहावीच्या परीक्षेत पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवणारे ३६ विद्यार्थी आहेत. बारावीच्या परीक्षेत विज्ञान, वाणिज्य आणि मानवविज्ञान शाखेतील मिळून ५४ विद्यार्थी पहिल्या तीन स्थानांवर आहेत. दहावीच्या परीक्षेत मुंबईच्या जुही कजारियासह पंजाब येथील मनहर बन्सल हा विद्यार्थी ५०० पैकी ४९८ गुण मिळवून प्रथम आला. बारावीच्या परीक्षेत कोलकाता येथे विज्ञान शाखेचा विद्यार्थी देवांग अगरवाल आणि बंगळूरु येथील मानवविज्ञान शाखेची विद्यार्थिनी विभा स्वामीनाथन पैकीच्या पैकी गुण मिळवून प्रथम आले. राज्यातील विद्यार्थ्यांनीही या परीक्षांमध्ये चमक दाखवली. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील २०८ शाळांमधील २१ हजार ३८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी अवघे ३२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. आयएससीच्या परीक्षेसाठी ४४ शाळांतील २ हजार ७३७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. देशात पहिल्या तीन क्रमांकावर स्थान मिळवणारे राज्यातील दहावीचे १६ तर बारावीचे तीन विद्यार्थी आहेत.

जुहीचे यश..

मी कोणतीही शिकवणी लावली नव्हती. मात्र, ठरावीक वेळेत प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केला. परीक्षेची तयारी करताना मी काही काळ थोडीशी विश्रांती घेऊन तणावमुक्त होण्याचा प्रयत्न केला, असे जुही कजारिया हिने सांगितले.  मला अभियांत्रिकी किंवा वाणिज्य क्षेत्रात करिअर करायचे आहे,  विलेपार्ले येथे राहणाऱ्या जुही हिचे वडील सनदी लेखापाल आहेत तर आई कर सल्लागार आहे. तिला गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि प्रॅक्टिकल ड्रॉईंग या विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण आहेत.

राज्यातील यशवंत आयसीएसई (दहावी)

देशात प्रथम (९९.६० टक्के) :

जुहू कजारिया (जमनाबाई नरसी स्कूल, जुहू, मुंबई)

द्वितीय (९९.४० टक्के) :

फोरम संजनवाला (जमनाबाई नरसी स्कूल, जुहू, मुंबई), अनुश्री चौधरी (गुंदेचा एज्युकेशन अ‍ॅकॅडमी, कांदिवली, मुंबई), यश भन्साळी (सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, ठाणे), अनुष्का अग्निहोत्री (चिल्ड्रन्स अ‍ॅकॅडमी,  मुंबई)

तृतीय (९९.२० टक्के) : दृष्टी अत्तरदे (विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल, नाशिक), वीर भन्साळी (द कॅथ्रेडल अँड जॉन कॅनन स्कूल, मुंबई), जुगल पटेल (जमनाबाई नरसी स्कूल, जुहू, मुंबई), करण आंदर्दे (माणेकजी कूपर एज्युकेशन ट्रस्ट स्कूल, मुंबई), झरवान श्रॉफ (विबग्योर हायस्कूल, गोरेगाव, मुंबई), अमन जवेरी (बॉम्बे स्कॉटिश स्कूल, मुंबई), आदित्य वाकचौरे, ओजस देशपांडे (सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, ठाणे), हुसेन बसराई (रायन इंटरनॅशनल स्कूल, मुंबई), हर्ष वोरा (पी. जी. गरोडिया स्कूल, मुंबई), श्रीनाभ अगरवाल (द चंदा देवी सराफ स्कूल, नागपूर)

आयएससी (बारावी)

देशात द्वितीय (९९.७५ टक्के) : मिहिका सामंत (मानवविज्ञान – सेंट ग्रेगोरिअस हायस्कूल, मुंबई)

तृतीय (९९.५०) – निमिष वाडेकर (विज्ञान), श्रेया राज (वाणिज्य) (सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, ठाणे), विश्रुती रंजन (विज्ञान – सेंट मेरीज स्कूल, पुणे)

देशातील निकालाची स्थिती आयसीएसई (दहावी)

देशात परीक्षेला बसलेले विद्यार्थी :

१ लाख ९६ हजार २७१, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी : ९८.५४

आयएससी (बारावी) : 

देशात परीक्षेला बसलेले विद्यार्थी : ८६ हजार ७१३,

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी : ९६.५२

‘मला उत्कृष्ट शिक्षक लाभले. त्यामुळे माझा जास्तीत जास्त अभ्यास शाळेतच व्हायचा. मला जेव्हा मनापासून वाटायचे तेव्हाच मी अभ्यास करायचे. अभ्यासाबाबत मी तडजोड केली नाही. कारण दिवसभर नुसता अभ्यास करून काहीही फायदा होत नाही. मी माझ्या सर्व आवडीनिवडी जोपासल्या. फोनचा वापर किती करायचा हे तुम्हाला स्वतला कळत असेल तर फोन वापरण्यात काहीही चूक नाही. मला सामाजिक शास्त्र, इंग्रजी आणि राज्यशास्त्र या विषयांत करिअर करायचे आहे.’ – मिहिका सामंत, (बारावी) सेंट ग्रेगोरिअस हायस्कूल

Story img Loader