स्वातंत्र्योत्तर भारतात शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भारताचा सर्वागीण विचार करून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केले. त्यातील काही रुजले तर काही फसले. सर्व शिक्षा अभियान यशस्वी ठरत असल्याचेही दावे केले जात आहेत. मात्र खरोखरच आपण सर्वाना शिक्षण देतो का? या शिक्षणाचा दर्जा काय? आपल्या शिक्षण पद्धतीत देशभक्ती, देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवा यांना नेमके काय स्थान आहे? देशात आजही तीस टक्क्यांहून अधिक लोक निरक्षर आहेत. इंग्रजी वाचता येणाऱ्यांची संख्या दोन टक्केही नाही. संगणकाचे ज्ञान असणाऱ्यांची संख्या अत्यल्प म्हणावी लागेल. अशा परिस्थितीतही आम्ही महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतो. दिवंगत भारतरत्न व राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या मतानुसार २०२० साली भारत महासत्ता होईल. त्यांना हा दुर्दम्य आत्मविश्वास कोणत्या कारणांमुळे होता ते त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. उद्याची तरुण पिढी आणि तळमळीने शिकविणारे शिक्षक यांच्या विश्वासावर समर्थ भारताचे स्वप्न त्यांनी पाहिले, हे स्वप्न उराशी बागळून अनेक शिक्षक आज विद्यादानाच्या यज्ञात सहभागी होताना दिसतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा