राज्याच्या शिक्षण विभागाने आदर्श शिक्षक पुरस्काराची रक्कम देताना भेदभाव केला असून शालेय शिक्षण विभागातील आदर्श शिक्षकांना १ लाख, तर उच्च व तंत्रशिक्षण विभागातील आदर्श शिक्षकांना २५ हजार जाहीर करून भेदभाव केला आहे. यामुळे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील शिक्षकांमध्ये नाराजी पसरली असून, हा भेदभाव न करता या विभागातील शिक्षकांनाही एक लाख रुपयांचे बक्षीस द्यावे, अशी मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील गुणवंत शिक्षकांचा शिक्षण विभागाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.
 शालेय शिक्षण विभागातर्फे एक लाख रुपये देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात येते, तर उच्च व तंत्र शिक्षण विभागातील शिक्षकांसाठी ही रक्कम १० हजार वरून २५ हजार रुपये करण्यात आली आहे.
पण यामुळे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील शिक्षकांवर अन्याय होत असून आदर्श शिक्षकांमध्ये भेदभाव न करता सर्व शिक्षकांना समान पुरस्कार देण्यात यावा, असे निवेदन मोते यांनी तावडे व शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांना दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ideal teacher award
Show comments