RPF Jawan Shoot : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमधील गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी तिघांची ओळख पटली होती. तर, चौथ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं. आता या चौथ्या व्यक्तीचीही ओळख पटली आहे. आरोपी चेतन सिंग याने केलेल्या गोळीबारात सहाय्यक उपनिरिक्षक टिकाराम मीना (५७), असगर अब्बास अली (४८), अब्दुल कादर मोहम्मद हुसैन भानपुरवाला (६४) आणि एक अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे. त्याचं नाव सय्यद सैफुद्दीन मैनुदीद (४३) असं आहे.

सय्यद सैफुद्दीन मैनुदीद हा मूळचा कर्नाटकमधील असून सध्या हैदराबाद येथे वास्तव्य करत होता. मैनुदीद हा मोबाइल दुरुस्ती करण्याचे काम करत होता. एक्स्प्रेसमधील बी-२ डब्यातून मैनुदीद प्रवास करत होता. त्याचा मृतदेह खानपान डब्यातून बोरिवली रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतला.

Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट

सैफुद्दीनला सहा महिन्यांची मुलगी

सैफुदीन हा अजमेर शरीफ दर्गा येथे गेला होता. तिथून तो हैदराबाद येथे त्याच्या घरी मुंबईमार्गे परतत होता. हैदराबाद येथे बाझार घाट परिसरात त्याचं मोबाईल दुरुस्तीचं दुकान होतं. तसंच, त्याच्या घरातील तो एकमेव कमावता व्यक्ती होता. त्याच्या पश्चात त्याची पत्नी, तीन मुली आहेत. ६ वर्षे, २ वर्षे आणि सहा महिन्यांच्या त्याला मुली आहेत.

हेही वाचा >> Jaipur-Mumbai Train Shooting: गोळीबारप्रकरणी रेल्वे पोलीस उत्तर प्रदेशात

सैफुदीनसोबत त्याच्या मोबाईल दुकानाचा मालक जाफर खान (७६) प्रवास करत होते. या जाफर खान यांच्या एका नातेवाईकाने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “चेतन सिंग बी २ कोचमध्ये घुसला. त्याने सैफुदीन यांना नाव विचारले. सैफुल्ला यांनी त्यांचं नाव सांगताच सिंग यांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्याला नेले. यावेळी जाफर खान यांनी सिंग यांच्यावर आक्षेप घेतल्यानंतर सिंग यांनी खान यांच्या दिशेने बंदूक दाखवली. त्यानंतर सैफुदीन यांना खानपान कक्षात (पॅन्ट्री) नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.”

अशी पटवली ओळख

सैफुदीनची ओळख मंगळवारीच पटवण्यात आली. माझा एक कर्मचारी रुग्णालयात त्याच्या चौकशीसाठी गेला होता. परंतु, बोरिवली जीआरपीमध्ये बरीच प्रतिक्षा करावी लागली. जीआरपीने माझ्या कर्मचाऱ्याला सैफुदीनचे फोटो दाखवले. त्यानंतर, माझ्या कर्मचाऱ्याने त्यांना सैफुदीनचे आधार कार्ड दाखवले”, असेही खान यांच्या नातेवाईकाने सांगितले.

धर्मावरून ओळखून मारण्यात आलं, आमदाराचा आरोप

हैदराबादमध्ये नामपल्लीचे आमदार जाफर हुसेन मेहराज यांनीही आरोप केला आहे. ते म्हणाले की, सैफुदीनला मारण्यापूर्वी त्याचे नाव विचारण्यात आले होते. तिथे इतर प्रवासी होते. त्याच्यासोबत त्याचा मालक (खान) प्रवास करत होते. कोणाला काही झाले नाही. दाढी असलेल्या सैफुदीनला त्याच्या धर्मावरून ओळखून मारण्यात आले. आमच्याकडे त्याच्या मालकाची साक्ष आहे की हत्येपूर्वी नावे विचारण्यात आली होती”, सैफुदीनचे दोन भाऊ आणि काकांसह मुंबईला जाण्यापूर्वी हैदराबादमध्ये पत्रकारांशी बोलताना आमदाराने आरोप हे केले.

गोळीबारप्रकरणी रेल्वे पोलीस उत्तर प्रदेशात

पश्चिम रेल्वेवरील जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये आरोपी चेतन सिंह याने सोमवारी १२ गोळ्या झाडल्या. त्यात चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकरण खूप गुंतागुतीचे असल्याने रेल्वे पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशमधील असल्याने त्याच्या गावी रेल्वे पोलीस जाऊन, प्रकरणाचे अधिक धागेदोरे शोधणार आहेत. तसेच एक्स्प्रेसमध्ये जेवढे प्रवासी होते, त्या प्रवाशांची विचारपूस करून त्याच्याकडून माहिती काढण्यात येणार आहे.