पावसाच्या तडाख्याने उन्मळून पडणारे  वृक्ष अथवा तुटणाऱ्या झाडाच्या फांद्या उचलण्यात कुचराई करणाऱ्या साहाय्यक आयुक्तांवर आपत्कालीन प्राधिकरणाने कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी मंगळवारी दिले.
झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र काही वेळा कंत्राटदारांकडून वृक्ष छाटणी करण्यात येत नाही. परिणामी अस्ताव्यस्त वाढणारे वृक्ष वाहतुकीस अडथळा ठरतात. तर काही कंत्राटदार छाटलेल्या वृक्षाच्या फांद्या उचलत नाहीत. रस्त्यात पडून राहिलेल्या फांद्या आणि पालापाचोळा पावसाच्या पाण्यामुळे कुजतो आणि त्यामुळे परिसरात दरुगधी पसरते. तसेच मुसळधार पाऊस पडताच हा कचरा पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांवर बसून परिसर जलमय होतो, अशी तक्रार वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांनी केली. त्यावर कामचुकारपणा करणाऱ्या साहाय्यक आयुक्तांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे कुंटे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader