आधी संप मागे घ्या, त्यानंतर चर्चा करू, असा पुनरुच्चार करत येत्या तीन दिवसात घंटागाडी कामगारांचा संप मिटला नाहीतर त्यांच्या जागी ठेकेदारामार्फत नव्या कामगारांची भरती करण्यात येईल, असा धमकीवजा इशारा महापालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांनी मंगळवारी दिला. तसेच ठाणेकरांना वेठीस धरून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची पद्धत अत्यंत चुकीची असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
समान काम आणि समान वेतन, या मागणीसाठी घंटागाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. आठवडा उलटूनही कामगारांच्या काम बंद आंदोलनाचा तिढा सुटू शकलेला नाही. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात कचऱ्याचे ढिग साचू लागल्याने ठाणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, शहरात कचरा उचलण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. पण, ती तोकडी पडत असल्याचे दिसून येते. याच मुद्दय़ावरून मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला असता, त्यावर आयुक्त असीम गुप्ता यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले. ठेकेदारामार्फत काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून न्यायालयाने त्यांचा संप बेकायदेशीर ठरविला आहे. या संबंधी ठेकेदारालाही नोटीस बजावून पर्यायी व्यवस्था करण्यास सांगितले. त्यानुसार, शंभर ते दोनशे कामगारांची भरती करण्यात आली आहे.
ठेकेदाराने सर्वच नव्या कामगारांची भरती केल्यास या कामगारांना पुन्हा नोकरीवर घेता येणार नाही. त्यामुळे सहानुभूतीचा विचार करून सर्वच जागी नव्याने कामगारांची भरती करण्यात आलेली नाही. घंटागाडी कामगारांची कायदेशीर मागणी असेल तर ती मान्य करण्यात येईल. त्यासाठी त्यांनी आधी संप मागे घेतला पाहिजे. महापालिकेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, त्या दबाबाला महापालिका प्रशासन बळी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तीन दिवसांत संप न मिटल्यास नव्या कामगारांची भरती
आधी संप मागे घ्या, त्यानंतर चर्चा करू, असा पुनरुच्चार करत येत्या तीन दिवसात घंटागाडी कामगारांचा संप मिटला नाहीतर त्यांच्या जागी ठेकेदारामार्फत नव्या कामगारांची भरती करण्यात येईल,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-07-2013 at 02:52 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If strike not call off then new workers will be recruit thane municipal commissioner