भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश केल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देऊ असा इशारा शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी दिला आहे.
शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर  व कोल्हापुरात महिलांना मंदिरात प्रवेश मिळवून दिल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी आंदोलनाचा इशारा  दिला आहे. देसाईंनी यासाठी ‘हाजी अली सबके लिए’ या फोरमची स्थापना केली आहे. हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी येत्या २८ तारखेपासून धरणं आंदोलनाला बसण्याचा इशारा तृप्ती देसाईंनी दिला आहे. पण, शिवसेना उपनेते हाजी अराफत शेख यांनी तृप्ती देसाई यांना विरोध दर्शवत ‘ जर त्यांनी हाजी अली दर्ग्यातील मजार परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना चपलांचा प्रसाद देऊन त्यांचे स्वागत करू’ असा इशारा दिला. तसेच देसाई यांनी हे सर्व वायफळ प्रकार बंद करावेत आणि सामाजिक हिताचे आणि लोकोपयोगी उपक्रम हाती घ्यावेत, असा सल्लाही शेख यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा