तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात जबरदस्तीने प्रेवश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा एमआयएम पक्षाकडून देण्यात आला आहे. तृप्ती देसाई आज हाजी अली येथे शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करणार आहेत. सध्या महिलांना याठिकाणी महिलांना विशिष्ट मर्यादेपर्यंतच जाण्याची परवानगी आहे. येथील मजार-ए-शरीफमध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. मात्र, पुरूषांच्या बरोबरीने महिलांनाही त्याठिकाणी जाता यावे, अशी मागणी आज तृप्ती देसाई हाजी अली ट्रस्टकडे करणार आहेत.
‘तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात आल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देऊ’ 
दरम्यान, आजच्या आंदोलनात हाजी अली दर्ग्यात कुठपर्यंत सोडले जाते, याचा अंदाज घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वी शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनीदेखील तृप्ती देसाईंच्या मागणीला विरोध दर्शवत दर्ग्यात आल्यास त्यांना चपलेने मारू, असा इशारा दिला होता.

Story img Loader