बाबरी मशिद पाडण्यात शिवसेनेची भूमिका नव्हती. असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी एका मुलाखतीत केलं. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच एकनाथ शिंदे हे आता कुणाला जोडे मारणार की स्वतःच्या तोंडावर जोडा मारून घेणार? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. तसंच भाजपाचं हिंदुत्व गोमूत्रधारी आहे ते देशाच्या कामाचं नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच सत्तेसाठी तुम्ही काय हवं ते चाटा पण यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नका असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी?

बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन सत्तेवर बसला आहात ना? आता भाजपाने बाळासाहेब ठाकरेंचा अपमान भाजपाने केला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे कुणाला जोडा मारणार आहेत? की स्वतःच्या तोंडावर जोडा मारून घेणार आहेत? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. भाजपाचं गोमूत्रधारी हिंदुत्व हे देशाच्या कामाचं नाही.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”

बाळासाहेबांचा इतका अपमान झाला आहे

बाळासाहेबांचा इतका अपमान झाला नाही. आता बाळासाहेबांचे नाव घेऊ नका. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच भाजप हा भारतीय जनता पक्ष नव्हे तर भरकटलेला जनता पक्ष असा आहे. या भरकटलेल्या पक्षासोबत किती दिवस बसणार असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. कसं आहे ते पटकन उत्तर देतात ना? मी बोलत असताना शिंदेंनी काय बोलायचं आहे ती स्क्रिप्ट भाजपाच्या कार्यालयात टाइप होत असेल. ती मुख्यमंत्र्यांना वाचू द्या, नीट पाठ करूद्या बघू ते काय म्हणतात असाही टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

काय चाटायचं ते चाटा पण बाळासाहेबाचं नाव घेऊ नका

आता मिंधेंनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे नाहीतर स्वत: मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. एवढंच नाही तर या अपमानानंतर ते कुणाला जोडे मारणार आहेत की त्याच जोड्याने तोंड फोडून घेणार आहेत हेदेखील त्यांनी सांगावं. तुम्हाला काय चाटायचं ते चाटा पण बाळासाहेबांचं नाव घेऊ नका. हे बाळासाहेबांचे विचार नाहीत. ज्या मस्तीमध्ये चंद्रकांत पाटील बोलत आहे, त्यांनी अडवाणींची मुलाखत पाहावी असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

Story img Loader