पल्लवी स्मार्त, एक्स्प्रेस
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : देशातील तंत्रशिक्षण क्षेत्रात अग्रणी असलेल्या मुंबई आयआयटीने ‘क्यूएस जागतिक विद्यापीठ मानांकना’मध्ये प्रथमच पहिल्या १५० संस्थांमध्ये स्थान पटकाविले आहे. आठ वर्षांपासून बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सनंतर (आयआयएस) ही कामगिरी करणारी आयआयटी मुंबई ही देशातील पहिलीच संस्था ठरली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या ‘क्यूएस जागतिक विद्यापीठ मानांकनां’मध्ये मुंबई आयआयटीने २३ स्थानांची झेप घेत १४९वे स्थान पटकाविले आहे. २०१६ साली १४७व्या स्थानी पोहोचलेल्या आयआयएसने पूर्वी हा विक्रम केला होता. मात्र यंदा आयआयएसच्या मानांकनात मात्र ७० स्थानांची घसरण झाली असून ते १५५व्या स्थानावरून २२५व्या स्थानी पोहोचले आहे. त्याबरोबरच आयआयटी दिल्ली १७४वरून १९७, आयआयटी कानपूर २६४वरून २७८ आणि आयआयटी मद्रास २५०वरून २८५व्या स्थानी घसरले आहेत. ब्रिटनस्थित मानांकन संस्था ‘क्यूएस’ने यंदा आपल्या पद्धतीमध्ये काहीसे बदल केले आहेत. यावर्षी प्रथमच ३ नवे निर्देशक शाश्वत उपक्रम, रोजगारनिर्मिती आणि आंतरराष्ट्रीय संशोधन हे तीन नवे निकष मानांकनासाठी वापरण्यात आले आहेत. या तीन निकषांमुळे अन्य मुद्दय़ांचे बल काहीसे घटले आहे. याचा फटका आयआयएससह अन्य भारतीय शिक्षण संस्थांना बसल्याचे दिसत असले तरी मुंबई आयआयटीला यामुळे वरचे स्थान मिळाले आहे. रोजगारनिर्मितीच्या निकषात मुंबई आयआयटीची कामगिरी इतरांपेक्षा सरस राहिली आहे.
‘क्यूएस’ने जाहीर केलेल्या ५०० संस्थांच्या क्रमवारीमध्ये भारतातील ४५ विद्यापीठे असून आशियातील चीन (७१) आणि जपान (५२)नंतर भारताचा तिसरा क्रमांक आहे. यंदा दिल्ली विद्यापीठ (४०७) आणि अण्णा विद्यापीठाने (४२७) या यादीमध्ये प्रथमच स्थान पटकाविले आहे.
करोना महासाथीच्या काळात
मुंबई आयआयतील संशोधनाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी अनेक प्रथितयश वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये येथील संशोधकांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. याचा दृष्य परिणाम बघायला मिळाला आहे.
– शुभाशिष चौधरी, संचालक, मुंबई आयआयटी