IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनने आयआयटी मुंबईला तब्बल १३० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनच्या या ऐतिहासिक सहकार्यामुळे आता आयआयटी मुंबई या ठिकाणी जागतिक दर्जाच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा स्थापना होण्यास मदत होणार आहे. राष्ट्र उभारणी आणि आर्थिक क्षेत्रात शैक्षणिक उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल समजलं जात आहे. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनने १३० कोटींची ही देणगी प्रतिज्ञाद्वारे दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एमओएफएसएल’चे सह-संस्थापक मोतीलाल ओस्वाल आणि रामदेव अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या फाउंडेशनकडून ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या १० टक्के इक्विटी, ज्याचे मूल्य सध्या चार हजार कोटी आहे. भारतीय शैक्षणिक संस्थेसाठी हे मोठे योगदान समजलं जात आहे. मोतीलाल ओस्वाल फाऊंडेशन आणि आयआयटी बॉम्बे यांच्या या सामंजस्य करारांतर्गत मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये तबब्ल १ लाख १.२ लाख चौरस फूट क्षेत्रफळात स्थापन करण्यात येणार आहे.

हेही वाचा : आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निवासी डॉक्टरांच्या सुविधांसाठी निधी देणार

हा अत्याधुनिक शैक्षणिक प्रोजेक्ट नावीन्य आणि संशोधनाचे केंद्र म्हणून काम करणार आहे आणि शैक्षणिक उत्कृष्टता, प्रगत प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे या माध्यमातून मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर आयआयटी मुंबईला जागतिक दर्जाची प्रतिभा तयार करण्यासाठी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानात आणखी सक्षम बनविण्यास सक्षण करेल. दरम्यान, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबई येथील मोतीलाल ओस्वाल सेंटर फॉर कॅपिटल मार्केट्सची कल्पना भारतीय वित्तीय क्षेत्राचा विकास आणि वाढ सक्षम करण्यासाठी उच्च-स्तरीय क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली आहे.

हे बहुविद्याशाखीय अर्थशास्त्र, व्यवस्थापन, ऑपरेशन्स रिसर्च, कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि गणित यासारख्या क्षेत्रांतून कौशल्य प्राप्त करेल. एमओसीएमची योजना अंडरग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्तरांवर अनेक शैक्षणिक कार्यक्रमची आहे. केंद्राने ऑनलाइन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाची कल्पना देखील केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तविक-जगातील डेटासह व्यावहारिक प्रशिक्षण आणि आर्थिक क्षेत्राचे भविष्य घडविण्याची संधी प्रदान करते.

दरम्यान, आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक शिरीष केदारे यांनी या महत्त्वाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर हे जागतिक उत्कृष्टतेच्या आणि एक नवे ध्येय गाठण्यासाठी आयआयटी मुंबईच्या प्रयत्नांमध्ये एक महत्वापूर्ण निर्णय ठरेल. ही देणगी आम्हाला आमच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि प्रगती करण्यास मदत करेल. तसेच जी ग्राउंडब्रेकिंग संशोधनाला चालना देण्यासाठी आवश्यक आहे. भांडवली बाजारासाठी मोतीलाल ओस्वाल केंद्राची स्थापना हा आयआयटी बॉम्बेसाठी महत्त्वाचा क्षण आहे. हा उपक्रम केवळ आर्थिक शिक्षणात संस्थेचा दर्जा वाढवेल, असे नाही तर आर्थिक बाजारपेठेतील पुढच्या पिढीचे पालनपोषण करण्यासाठी एक प्रमुख केंद्र म्हणून तिचे स्थान मजबूत करेल. जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वात योगदान देण्याच्या आणि जागतिक उत्कृष्टतेची नवीन उंची गाठण्याच्या आमच्या व्यापक दृष्टीकोनाशी हे महत्वाचं पाऊल ठरेल. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनच्या दूरदर्शी योगदानाबद्दल आम्ही आभारी आहोत.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iit bombay news motilal oswal foundation donates 130 crores to iit mumbai gkt