मुंबई : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईने (आयआयटी मुंबई) ई मोबिलिटीमध्ये प्रगत शिक्षणासाठी ई पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा १८ महिन्यांचा उद्योग केंद्रीत अभ्यासक्रम मार्च २०२५ पासून सुरू करण्यात येणार आहे. आयआयटी मुंबई आणि एडटेक ग्रेट लर्निंग या कंपनीने ‘ई माेबिलिटीचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम’ तयार केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभाद्वारे पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘ई-मोबिलिटी’मध्ये सुरू करण्यात आलेला ई-पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम हा आयआयटी मुंबईच्या अद्ययावत शिक्षणाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या अभ्यासक्रमासाठी सी १९७३ ईव्ही पॉवर ट्रेन प्रयोगशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विविध कंपन्यांसोबत करण्यात येणारे करार हे शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव यामधील दरी दूर करण्यास महत्त्वपूर्ण ठरत आहेत, असे प्रा. शिरीष केदारे यांनी या अभ्यासक्रमाचे अनावरण करताना सांगितले.

हेही वाचा…पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करून सव्वा कोटी थकवले

‘ई-मोबिलिटी’ या क्षेत्रात काम करत असलेली व्यक्ती, संशोधक, उद्योजक यांना प्रगत शिक्षण मिळावे यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामध्ये इलेक्ट्रिक वाहन डिझाइन, बॅटरी तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल ड्राइव्ह, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि यासह विविध प्रमुख विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये व्यावहारिक आणि परस्परसंवादी शिक्षणावर भर दिल्याचे केदारे यांनी सांगितले.

सरकारी धोरणे आणि वाढती पर्यावरण जागरूकता यामुळे भारतात आणि जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढत आहे. त्यामुळे हे क्षेत्र झपाट्याने प्रगती करीत आहे. ई मोबिलिटी क्षेत्रामध्ये कुशल व्यक्तींची मागणी वाढत आहे. त्यामुळे या उद्योगात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला व्हेईकल सब सिस्टिम मॉडेलिंग, इलेक्ट्रिक मोटर्ससाठी एम्बेडेड कंट्रोलर, पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टिमचे सिम्युलेशन, बॅटरी मॉडेलिंग टेक्निक ॲण्ड डिग्रेडेशन फिनोमेनो, मॉडेलिंग ॲण्ड कंट्रोल ऑफ ईव्ही चार्जर्स, ईव्ही ऑन ग्रीड इन्फ्रास्ट्रक्चर यासारखे प्रकल्प असणार आहेत, असे ग्रेट लर्निंगचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन लखमराजू यांनी सांगितले.

हेही वाचा…डोळ्यात मिरचीपूड टाकून महिलेच्या लुटण्याचा प्रयत्न

प्रवेश पात्रता

‘ई-मोबिलिटी’ ई-पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बी.ई. / बी.टेक पदवी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाच्या संबंधित चार वर्षांची बीएस्सी किंवा बीएस पदवी. तसेच एमटेक, एमएस्सी, एमएस हे पदव्युत्तर किंवा अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित डॉक्टरेट पदवी असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.