मुंबई: आयआयटी, मुंबई संस्थेत प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे (बी.टेक) शिक्षण घेणाऱ्या दर्शन सोळंकी या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी आता गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक (एसआयटी) याप्रकरणी चौकशी करणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. राज्य शासनाने याप्रकरणी आदेश दिले असून त्याची प्रत आम्हाला सोमवारी मिळाली. त्यानुसार आता चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, गुन्हे (प्रकटीकरण-१) कृष्णकांत उपाध्याय व साहाय्यक पोलीस आयुक्त (सांताक्रुझ विभाग) यांचा सहभाग या विशेष तपास पथकात असेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा