मुंबई: गुजरातमधून गुटखा घेऊन मुंबईत आलेले दोन टेम्पो टिळकनगर पोलिसांनी घाटकोपरच्या छेडा नगर परिसरातून ताब्यात घेतले. या दोन्ही टेम्पोमधून पोलिसांनी २१ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असून याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही टेम्पो चालकांना अटक केली. राज्यात गुटखा बंदी लागू आहे. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा घेऊन दोन टेम्पो मुंबईत येत असल्याची माहिती टिळक नगर पोलिसांना मिळाली.  घाटकोपरच्या छेडा नगर येथून हे टेम्पो मानखुर्दच्या दिशेने जाणार होते, असेही पोलिसांना समजले होते.

त्यामुळे पोलिसांनी छेडानगर जंक्शन परिसरात  सोमवारी रात्री सापळा रचला. यावेळी नमुद वर्णनाचे दोन टेम्पो छेडा नगर परिसरात दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही टेम्पो अडवले आणि त्यांची तपासणी केली. राज्य सरकारने बंदी घातलेल्या विविध कंपन्यांच्या गुटख्याचा मोठा साठा या टेम्पोमध्ये आढळला. पोलिसांनी तत्काळ दोन्ही टेम्पो चालकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. हा गुटखा गुजरातमधून आणल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी टेम्पोचालक अब्दुल कादरी (३०) आणि आकाश हातराळे (३०) या दोघांना अटक केली असून दोन्ही टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

air quality in some parts of mumbai satisfactory
मुंबईमधील काही भागातील हवाच ‘समाधानकारक’; घाटकोपरमधील हवा ‘वाईट’
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
drunk up man reports potato theft
Video: पाव किलो बटाटे चोरी झाले म्हणून पठ्ठ्याने पोलिसांना घेतलं बोलावून; पोलिसांच्या मजेशीर चौकशीचा व्हिडीओ व्हायरल
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
Western Railway finalized connecting Valsad fast passenger train
वलसाड फास्ट पॅसेंजर गाडीला डबल डेकर डब्यांचा ४ जानेवारी अखेरचा दिवस
Uttam Jankar On Mahayuti Government
Uttam Jankar : “तीन महिन्यांत राज्यातील सरकार पडणार”, शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय चर्चांना उधाण
BMC Recruitment 2024 Brihanmumbai Municipal Corporation City Engineer 690 seats check all details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
Kurla bus accident , police claim in court ,
कुर्ला बस दुर्घटना चालकामुळेच, संजय मोरेच्या जामिनाला विरोध करताना पोलिसांचा न्यायालयात दावा
Story img Loader