झोपडीधारक पर्यायी घरांमध्ये राहायला जात नसल्याने कारवाई
भायखळा पश्चिम रेल्वेस्थानक परिसरातील बकरी अड्डा येथील २८१ अनधिकृत झोपडय़ा जमीनदोस्त करून महापालिकेने ना. म. जोशी मार्गा मोकळा केला. महात्मा गांधी पथक्रांती योजनेंतर्गत पालिका प्रशासनाने ही कारवाई केली. बकरीअड्डा येथील ना. म. जोशी मार्गावर रस्ता आणि पदपथावर २८९ झोपडय़ा होत्या. म. गांधी पथक्रांती योजनेअंतर्गत येथील १८० झोपडीधारकांना पर्यायी घरे देण्यात आली होती. मात्र काही झोपडीधारक पर्यायी घरांमध्ये राहायला जात नव्हते. त्यामुळे कारवाई करून पालिकेने झोपडय़ांचे अतिक्रमण हटविले. ११ जेसीबी यंत्रे, १३ डम्पर्स आणि २५० पोलिसांच्या मदतीने २५० पालिका कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलन) आनंद वागराळकर, उपायुक्त (परिमंडळ १) वसंत प्रभू, ई विभागाचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
बकरीअड्डा परिसरात २८१ झोपडय़ा जमीनदोस्त
भायखळा पश्चिम रेल्वेस्थानक परिसरातील बकरी अड्डा येथील २८१ अनधिकृत झोपडय़ा जमीनदोस्त करून महापालिकेने ना. म. जोशी मार्गा मोकळा केला. महात्मा गांधी पथक्रांती योजनेंतर्गत पालिका प्रशासनाने ही कारवाई केली.
First published on: 08-11-2012 at 03:10 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal hut breakdown