झोपडीधारक पर्यायी घरांमध्ये राहायला जात नसल्याने कारवाई
भायखळा पश्चिम रेल्वेस्थानक परिसरातील बकरी अड्डा येथील २८१ अनधिकृत झोपडय़ा जमीनदोस्त करून महापालिकेने ना. म. जोशी मार्गा मोकळा केला. महात्मा गांधी पथक्रांती योजनेंतर्गत पालिका प्रशासनाने ही कारवाई केली. बकरीअड्डा येथील ना. म. जोशी मार्गावर रस्ता आणि पदपथावर २८९ झोपडय़ा होत्या. म. गांधी पथक्रांती योजनेअंतर्गत येथील १८० झोपडीधारकांना पर्यायी घरे देण्यात आली होती. मात्र काही झोपडीधारक पर्यायी घरांमध्ये राहायला जात नव्हते. त्यामुळे कारवाई करून पालिकेने झोपडय़ांचे अतिक्रमण हटविले. ११ जेसीबी यंत्रे, १३ डम्पर्स आणि २५० पोलिसांच्या मदतीने २५० पालिका कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलन) आनंद वागराळकर, उपायुक्त (परिमंडळ १) वसंत प्रभू, ई विभागाचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा