लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : राज्यात बेकायदेशीरपणे आधुनिक शस्त्र विकणाऱ्या एका मोठ्या विक्रेऱ्यांसह तिघांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. आरोपीकडून आठ पिस्तुल आणि १३८ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

team india bus from gujarat
क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस, विरोधकांची सरकारवर टीका; म्हणाले, “आमची BEST…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Milind Narvekar, Legislative Council,
मिलिंद नार्वेकर ‘खेळ’ करणार ?

जुहू येथे एक व्यक्ती शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली. त्यांच्या सुचनेनुसार पथकाने जुहूमधील आयएमए मॉल परिसरात सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती तेथे येताच पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसे सापडली.

आणखी वाचा-मोफा कायद्यातील प्रस्तावित दुरुस्ती अनावश्यक! मुंबई ग्राहक पंचायतीची भूमिका  

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्याने ऐरोली येथे एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरात आणखी शस्त्रे ठेवल्याची माहिती दिली. याप्रकरणी मीताईलाल गुलाब चौधरी (५३) याला अटक करण्यात आली. तसेच त्याने दिलेल्या माहितीनुसार ऐरोली येथून आणखी पाच पिस्तुले आणि १२१ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

चौधरी याने चौकशीत दावर चंद्रप्पा देवरमनी उर्फ धावल या साथीदाराचे नाव सांगितले. त्यानुसार पथकाने ऐरोली येथे वास्तव्यास असलेल्या धावललाही ताब्यात घेतले. धावलच्या परिचित ठिकाणी चौधरीने पाच पिस्तुले आणि १२१ काडतुसे लपवून ठेवली होती. दरम्यान, दोघांच्या चौकशीत घणसोली येथे राहणाऱ्या व सुरक्षा एजन्सी चालविणाऱ्या पुष्पक मढवी (३४) याचे नाव उघड झाले. चौधरी व धावलने दोन पिस्तुल, काडतुसे मढवीला विकल्याचे सांगितले. त्यानुसार मढवीला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.