मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट मिळालेल्या अदानी समूहाने ३१ मे २ जून दरम्यान धारावीमध्ये ‘धारावी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धे’चे आयोजन केले आहे. या स्पर्धेत बेकायदेशीररित्या ड्रोनचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहूनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी छायाचित्रकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – मुंबई : करी रोड, डिलाईल रोड, लोअर परळमध्ये ६, ७ जून रोजी पाणीपुरवठा बंद
हेही वाचा – मुंबई : ‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’ आणि मोनोरेलसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित
धारावी पुर्नविकासास धारावीकरांचे समर्थन मिळत आहे, हा संदेश देण्यासाठी तसेच स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे अदानी समूहाकडून सांगण्यात येत आहे. यानंतरही अशा स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचेही अदानी समूहाकडून सांगितले जात आहे. मात्र धारावी प्रीमियर लीग आता वादात अडकली आहे. या स्पर्धेत ड्रोनचा वापर करण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शाहू नगर पोलिसांनी बेकायदेशीररित्या ड्रोनचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.