मुंबई : मुंबईत गुरुवारपासून पावसाचा जोर वाढला असून शुक्रवारीही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, पुढील काही तासांत मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई आणि उपनगरांत गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे काही विमानेही रद्द करण्यात आली आहेत.
उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाची प्रणाली असून, गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे याचाच परिणाम म्हणून पुढील एक – दोन दिवस मुंबईसह राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विमानाची उड्डाणे विलंबाने
मुसळधार पावसामुळे काही विमानांचे आगमन – निर्गमन उशीराने होईल. मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे विमान सेवेवर परिणाझ झाल्याची माहिती स्पाईस जेटने ‘एक्स’च्या माध्यमातून दिली.
हेही वाचा : कारण राजकारण: वर्सोव्याची जागा काँग्रेसला सोडणार?
आजचा अंदाज
अतिवृष्टी
रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया
मुसळधार ते अतिमुसळधार
ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा
हेही वाचा : विधानसभेसाठी शिंदे गटाच्या मोर्चेबांधणीला सुरुवात; महायुतीत १०० जागांसाठी आग्रही
मुसळधार
मुंबई, कोल्हापूर</p>
वादळी वाऱ्यासह पाऊस
जालना, हिंगोली, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा