नैऋत्य मोसमी वारे ११ जून रोजी तळकोकणात दाखल झाले होते. मात्र, त्यानंतर मोसमी वाऱ्यांचा प्रवास थंडावला होता. एकूण सहा दिवस एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी दक्षिण आणि उत्तर भारतात वाटचाल केली आहे. पुढील तीन दिवसांत नैऋत्य मोसमी वारे मुंबई, पुणे, मराठवाडा आणि महाराष्ट्राचा उर्वरीत भाग व्यापणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच २३ जूनपासून नैऋत्य मोसमी वारे सक्रीय होतील अशी शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा >>> मुंबई: पावसाळ्यात लोकल कशी चालवायची याचे मोटरमनना प्रशिक्षण; लोको पायलट, मोटरमनसाठी सीएसएमटी येथे उभारली सिम्युलेटर यंत्रणा

Constant changes in the states climate But wait for the winter
राज्यात थंडीची प्रतिक्षाच! पाऊस मात्र…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
Increase in heat in next two days in Mumbai print news
मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेचे
Sun nakshatra change 2024
दिवाळीनंतर ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार धनसंपत्तीचे सुख
Maharashtra winter marathi news
राज्यभरात थंडीची चाहूल, किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या खाली
la nina marathi news
विश्लेषण: ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकल्याने काय होणार?
Diwali muhurat trading 2024
मुहूर्ताचे सौदे यंदा शुक्रवारी संध्याकाळी

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागांत प्रगती केली आहे. तसेच पश्चिम बंगालचा दक्षिण भाग, झारखंड येथे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी प्रगती केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यांची सीमा रत्नागिरी, रायचूर, श्रीनिकेतन या भागात आहे. मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत दक्षिण द्विपकल्प, ओरिसाचा काही भाग आणि पश्चिम बंगालच्या काही भागात नैऋत्य मोसमी वारे प्रगती करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा >>> आडमुठ्या झोपडीधारकांमुळे पुनर्वसनाला विलंब नको; उच्च न्यायालयाचे आदेश

दरम्यान, बीपरजॉय चक्रीवादळ निवळले असून ते राजस्थान आणि मध्य प्रदेश येथे सक्रीय आहे. तो पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. तसेच तामिळनाडूच्या किनारपट्टीलगत १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे आणि केरळच्या किनारपट्टीलगत हवेचा कमी दाबाचा पट्टा असून तो ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर आहे.

मुंबईत दोन दिवस ढगाळ वातावरण तसेच हलका पाऊस पुढील दोन दिवस मुंबईत अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३ अंश सेल्सिअस आणि २८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.