मुंबई : मुंबई आणि परिसरात मंगळवारी हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, पावसाने तो पुन्हा एकदा चुकीचा ठरवला आहे. मंगळवारी पावसाने उघडीप दिली. दरम्यान, बुधवारपासून शहर आणि उपनगरांत हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवमान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यातील अनेक भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. परिणामी मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबई तसेच इतर भागात पावसाचा जोर वाढला होता. त्यानंतर हवामान विभागाने मंगळवारी मुंबईसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र, प्रत्यक्षात शहर आणि उपनगरात मंगळवारी पावसाने विश्रांती घेतली. काही ठिकाणी पहाटे हलक्या सरी बरसल्या त्यानंतर संपूर्ण दिवस कोरडा होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा