मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबईतील अनेक मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. त्यामुळे, पर्यायी मार्गांवरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.

वांद्रे – कुर्ला संकुलात मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीएच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानिमित्त्याने मुंबईसह राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन गुरुवारी वाहतुकीच्या काही मार्गांत बदल करण्यात आले होते. त्यामुळे, पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सागरी मार्गाकडून बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने एमएमआरडीए जंक्शन येथून धारावी टी जंक्शनवरून कुर्ल्याकडे, तसेच पूर्व द्रुतगती मार्गाकडे वळवण्यात आली होती. यावेळी टी जंक्शन परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता. तेथील वाहतूक संथगतीने सुरू होती. याशिवाय संत गुरुनानक रुग्णालयाजवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथे मोठ्या प्रमाणात वाहने खोळंबल्याचे दिसत होते. याशिवाय खेरवाडी कलानगर जंक्शन येथेही वाहतूक काहीशी संथ गतीने सुरू होती. पश्चिम द्रुतगती मार्गावरही काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
minister chandrakant patil express claim about bjps vote share increasing in loksatta loksamvad
मतदान वाढेल; फायदा भाजपला ; चंद्रकांत पाटील यांचा दावा
Lakhat Ek Aamcha Dada fame nitish Chavan wishing post for Mahesh Jadhav
Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
I have responsibility of holding big post of state says Jayant Patil
राज्याचे मोठे पद सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर- जयंत पाटील

हेही वाचा – “पंतप्रधानांच्या हस्ते गटाराचं उद्घाटन करावं, हे…”; मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून नाना पटोलेंचा भाजपाला टोला

पंतप्रधांनाच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग व सर्व रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. यातून रुग्णवाहिका, शाळेच्या बस आणि इतर बस वगळण्यात आल्या होत्या. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी २५० हून एसटी बसेसचे आरक्षण करण्यात आले होते. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून एसटी बसेस मुंबईत दाखल झाल्या. मुंबई पोलिसांच्या ९०० अधिकाऱ्यांसह साडेचार हजार पोलीस वांद्रा – कुर्ला संकुल येथे तैनात करण्यात आले होते. त्यात २७ सहायक पोलीस आयुक्त, १७१ पोलीस निरीक्षक यांचा समावेश होता. संपूर्ण बीकेसी परिसरात वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली होती.

हेही वाचा – Narendra Modi Mumbai visit : पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर; वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयांना दुपारनंतर सुट्टी जाहीर

पर्यायी मार्ग

पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सागरी सेतूकडून बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने एमएमआरडीए जंक्शन येथून धारावी टी जंक्शनवरून कुर्ल्याकडे, तसेच पूर्व द्रुतगती मार्गाकडे वळविण्यात आली. संत ज्ञानेश्वर मार्गावरून इन्कम टॅक्स जंक्शनकडून पुढे बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने गुरूनानक रुग्णालयाजवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथून कलानगरमार्गे सरळ पुढे धारावी टी जंक्शनवरून पुढे कुर्ल्याकडे जात होती. पूर्व द्रुतगती महामार्ग, चुनाभट्टीवरून, कनेक्टरमार्गे येणारी वाहने एनएसई जंक्शन, आयकर जंक्शन, फॅमिली कोर्ट, एमएमआरडीएवरून पुढे जाण्यास मार्ग मोकळा होता.