मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – मस्जिद स्थानकांदरम्यान कर्नाक उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. या कामानिमित्त सीएसएमटी – भायखळादरम्यान रविवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे. परिणामी, ब्लॉक काळात कोकण रेल्वेच्या रेल्वेगाड्या दादरपर्यंत चालवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी – मशीद स्थानकांदरम्यान दीडशेहून अधिक वर्ष जुना कर्नाक उड्डाणपुलाचे सप्टेंबर २०२२ मध्ये पाडकाम करण्यास सुरुवात केली. पाडकाम पूर्ण झाल्यानंतर या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू झाले. गेल्या काही कालावधीत विशेष रेल्वे वाहतूक ब्लाॅक घेऊन तुळया उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारी रात्रकालीन ब्लाॅक घेतल्याने अनेक लोकलसह लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. गाडी क्रमांक १२०५२ मडगाव – सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवून अंशत: रद्द करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक २०११२ मडगाव – सीएसएमटी कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेलपर्यंत चालवून अंशतः रद्द करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवून अंशत: रद्द करण्यात येणार आहे. तर, गाडी क्रमांक १२०५१ सीएसएमटी – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस दादर येथून सुरू होईल. तसेच गाडी क्रमांक १०१०३ सीएसएमटी -मडगाव मांडवी एक्स्प्रेसचा प्रवास पनवेलवरून सुरू होईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग
father Thomas d souza
वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस डिसोजा, व्हॅटीकन सिटीच्या पोपकडून घोषणा
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
cargo vehicle caught fire on Mumbai Ahmedabad National Highway
महामार्गावर मालवाहतूक वाहनाला भीषण आग, मालजीपाडा वासमाऱ्या पुलाजवळील घटना

हेही वाचा >>>समुपदेशनामुळे मुलीवर झालेला अत्याचार उघडकीस; मावशीच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

ब्लाॅक कधी : रविवारी रात्रकालीन रात्री १२.३० ते रात्री ३.३० वाजता (३ तासांचा ब्लाॅक)

कुठे : भायखळा – सीएसएमटी अप आणि डाऊन धीमी, जलद मार्गावर

वडाळा रोड – सीएसएमटी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

– ब्लॉक कालावधीत भायखळा – सीएसएमटीदरम्यान मुख्य मार्गावर आणि वडाळा – सीएसएमटी हार्बर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल.

– मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील लोकल भायखळा, परळ, ठाणे आणि कुर्ल्यापर्यंत चालवण्यात येतील. तसेच या स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने धावतील.

– हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल वडाळा रोड स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. तसेच या स्थानकातून पनवेल दिशेकडे लोकल धावतील.

हेही वाचा >>>Dasara Melava 2024 Live Updates : उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला सुरुवात; प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

मुख्य मार्गावर शेवटच्या लोकल कोणत्या ?

रात्री १२.१२ वाजता सीएसएमटी – कर्जत शेवटची लोकल सुटेल

रात्री १०.४८ वाजता डोंबिवली – सीएसएमटी शेवटची लोकल सुटेल.

मुख्य मार्गावर पहिल्या लोकल कोणत्या ?

पहाटे ४.४७ वाजता सीएसएमटी – कर्जत पहिली लोकल सुटेल.

रात्री ३.२३ वाजता कल्याण – सीएसएमटी पहिली लोकल सुटेल.

हार्बर मार्गावर शेवटच्या लोकल कोणत्या ?

रात्री १२.१३ वाजता सीएसएमटी – पनवेल शेवटची लोकल सुटेल.

रात्री १०.४६ वाजता पनवेल – सीएसएमटी शेवटची लोकल सुटेल.

हार्बर मार्गावर पहिल्या लोकल कोणत्या ?

पहाटे ४.५२ वाजता सीएसएमटी – पनवेल पहिली लोकल सुटेल.

पहाटे ४.१७ वांद्रे – सीएसएमटी पहिली लोकल सुटेल.