लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई: मराठी नाट्यसृष्टीला उभारी मिळावी आणि नवी मराठी नाटके रंगभूमीवर अधिकाधिक यावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासन निर्णयानुसार १६ मे ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत रवींद्र नाट्य मंदिरात सर्व मराठी नाटकांच्या प्रयोगासाठी केवळ पाच हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. कोरोना व त्यानंतरच्या काळात नाट्यसृष्टीचे झालेले नुकसान विचारात घेऊन पर्यटन व सांस्कृतिक विभागातर्फे हा निर्णय घेतला आहे.
रवींद्र नाट्य मंदिरातील नाट्यगृहाची आसन क्षमता ९११ असून यापूर्वी सोमवार ते शुक्रवार या काळात सकाळच्या सत्रासाठी ८,५०० रुपये, तर दुपारी व संध्याकाळच्या सत्रासाठी १,५०० रुपये भाडे आकारण्यात येत होते. तसेच, शनिवार – रविवारसह इतर सुट्टीच्या दिवशी सकाळी ११ हजार रुपये, तर दुपार व संध्याकाळच्या सत्रासाठी १३ हजार रुपये इतके भाडे आकारण्यात येत होते.
आणखी वाचा- मुंबई: मुंबई विद्यापीठातील काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
मुंबईमध्ये एप्रिल २०२० मध्ये पहिला करोनाबाधित रुग्ण सापडला आणि त्यानंतर टाळेबंदी लागू झाली. टाळेबंदीच्या काळात सर्वच कारभार ठप्प झाले आणि हातावर पोट असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अनेक कलावंत आणि पडद्यामागील कलाकारांची अवस्थाही बिकट बनली. त्यानंतर टाळेबंदी शिथिल करण्यात आली, मात्र कडक निर्बंध लागू करण्यात आले. परिणामी, नाट्यसृष्टीवरील संकटाचे ढग गढदच होते. नाट्यगृह, चित्रपटगृह सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. अखेर काही निर्बंध घालून नाट्यगृह, चित्रपटगृह सुरू करण्यात आली. मात्र निर्बंध आणि करोनाचे संकट यामुळे नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक मंडळी नाट्यगृहाकडे फिरकतही नव्हती. परिणामी, मोठा तोटा पदरी पडण्याच्या भितीने अनेक नाट्यसंस्थांनी सावध पावले उचलण्यास सुरुवात केली. एकूण परिस्थितीत नाट्यसृष्टीवर अवलंबून असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती.
आणखी वाचा- मुंबई: मिठी नदी काठी मनोरंजन केंद्र आणि क्रीडा संकुल
करोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर नाट्य प्रयोगांना सुरुवात झाली. मात्र करोनाकाळात झालेला तोटा भरून काढण्याचे मोठे आव्हान नाट्यसृष्टीसमोर आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने नाट्यसृष्टीच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून १६ मे ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत रवींद्र नाट्गृहात मराठी नाटकांच्या प्रयोगासाठी पाच हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे नाट्यसृष्टीकडून स्वागत करण्यात येत आहे.