Mumbai Local Train : मुंबई लोकलने नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवास सोयीचा आणि आरामशीर व्हावा याकरता रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. तसंच, प्रवासीवहन क्षमता वाढवण्याकडेही भर दिला जात आहे. पिक अवर्समध्ये चाकरमन्यांना लोकल ट्रेनच्या दारात लटकून प्रवास करावा लागतो. हा प्रकार टाळण्याकरता आणि एका ट्रेनमधून अधिकाधिक प्रवाशांना प्रवास करता यावा याकरता पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून हा बदल लागू होणार आहे.

पश्चिम रेल्वेने काय निर्णय घेतला?

१५ ऑगस्टपासून १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेने आज सोमवारी जाहीर केलेल्या माहतीनुसार, ४९ लोकल १५ डब्यांच्या करण्यात येणार आहेत. मिड डे ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
train accident mock drill video fact check
दोन ट्रेन समोरासमोर धडकल्या! रेल्वेचा एक डबा थेट दुसऱ्या डब्यावर चढला, अनेक प्रवासी गंभीर जखमी? अपघाताच्या घटनेचा थरारक Video? वाचा, सत्य घटना
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण

हेही वाचा >> “मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी…”, एकनाथ शिंदेंनी सांगितला सरकारचा प्लान; म्हणाले, “म्हाडा…”

प्रवासी वहन क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार

१२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या केल्यानंतर २५ टक्क्यांनी प्रवाशांची क्षमता वाढणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेने नेमकं काय म्हटलंय?

“मुंबई उपनगरी विभागातील लोकलमधून अधिकाधिक प्रवाशांना प्रवास करता यावा याकरता उत्तम रेल्वे सेवा प्रदान करण्याच्या उपक्रमाअंतर्गत पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या ४९ लोकल ट्रेनचे १५ डब्यात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल १५ ऑगस्ट २०२३ पासून प्रभावी होईल”, असं पश्चिम रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. “हा बदल म्हणजे पश्चिम मार्गावरील रेल्वे प्रवाशांसाठी मोठे वरदान ठरणार आहे”, असंही पत्रकांत म्हटलं आहे.

१५ डब्यांच्या लोकलची संख्या १९९ वर

“प्रत्येक ट्रेनची वहन क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे. यासह, पश्चिम मार्गाच्या मुंबई उपनगरी विभागात एकूण १५ डब्यांची रेल्वेची संख्या १५० वरून १९९ पर्यंत वाढेल. वाढीव डब्यांच्या २५ लोकल डाऊन मार्गावर तर २४ लोकल अप मार्गावरून धावणार आहेत.