सौरभ कुलश्रेष्ठ

उद्योगक्षेत्रात नव्या लोकांना संधी देताना पदांच्या संख्येच्या तुलनेत उमेदवारांना छाननीसाठी बोलवावे लागते. त्यासाठी पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्र माच्या परीक्षेतील कामगिरी ही प्राथमिक चाळणी म्हणून काम करते. त्यामुळे परीक्षाच नको हा विचार व्यवहार्य नाही. आणखी काही महिन्यांनी परीक्षा घेण्याचा किं वा पारंपरिक पद्धतीऐवजी नावीन्यपूर्ण मार्गाने परीक्षा घेण्याचा मार्गही उपयुक्त ठरेल, असा सूर उद्योगक्षेत्रातील जाणकारांनी लावला आहे.

राज्यात अंतिम वर्षांच्या परीक्षांवरून बराच गोंधळ सुरू आहे. त्याबाबत उद्योगक्षेत्रातील धुरिणांमध्ये नापसंतीची भावना व्यक्त होत आहे. आधी औद्योगिक मंदी व त्यात आता टाळेबंदी असे आव्हान उद्योगविश्वापुढे आहे. त्यातून बाहेर येऊन उद्योगक्षेत्र पूर्वपदावर यायला वेळ लागणार असल्याने नव्याने नोकऱ्यांची संधी निर्माण व्हायलाही वेळ लागेल. त्यामुळे आताच परीक्षा घेतली पाहिजे असे काही नाही. काही महिन्यांनी ती घेतली तरी चालण्यासारखे आहे.

समजा १० जागा असल्या तर अंतिम वर्षांच्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावले जात नाही. परीक्षेतील कामगिरीचा आधार प्राथमिक चाळणी म्हणून लावला जातो. त्यामुळे परीक्षा रद्द करणे व त्यातही व्यावसायिक अभ्यासक्र मांच्या परीक्षा रद्द करणे व्यवहार्य नाही, असे एण्डय़ुरन्स समूहाचे व्यवस्थापकीय सल्लागार राम मारलापल्ले यांनी सांगितले. तर परीक्षा रद्द करण्याऐवजी छोटी का होईना पण परीक्षा घ्यावी. तेच विद्यार्थ्यांसाठी हिताचे राहील, अशी भूमिका ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी मांडली.

अडचणी काय?

* उद्योगक्षेत्र नोकरी देताना स्वत:ची चाचणी घेतेच. आम्ही दरवर्षी दोनशेहून अधिक जणांची भरती करतो व त्यात १०० ते १५० नुकतेच उत्तीर्ण विद्यार्थी असतात. पण नोकरीच्या चाचणीसाठी कोणाला बोलावायचे याचा निर्णय परीक्षेतील कामगिरीवरून ठरतो, ती एक प्राथमिक चाळणी असते.

* व्यावसायिक अभ्यासक्र मांसाठी परीक्षा रद्द करण्याऐवजी ती पारंपरिक पद्धतीने न घेता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून घेता येईल. अंतिम सत्राच्या अभ्यासक्र मातील प्रमुख गोष्टींचे आकलन तपासण्यासाठी छोटी व काठिण्यपातळी अधिक असलेली परीक्षा घ्यावी, असे मत एक्सपर्ट ग्लोबलचे संचालक मुकुंद कुलकर्णी यांनी मांडले.

Story img Loader