मुंबई: दोन महिन्यांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली होती. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान अनेकदा मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम मध्यम असल्याचे दिसून आले. या दोन महिन्यात मुंबईतील सरासरी निर्देशांक १५०-२०० पर्यंत असल्याचे दिसून आले. मात्र आता जानेवारीच्या सुरुवातीपासून मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा होत असल्याचे दिसते आहे. दरम्यान, समीर ॲपनुसार सोमवारी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ९८ म्हणचेच समाधानकारक श्रेणीत नोंदला गेला आहे.

प्रदूषण मापनासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची १४ केंद्रे, भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था, पुणे यांची ९ केंद्रे तर पालिकेची ५ केंद्रे मुंबईत स्थापित करण्यात आली आहेत. या केंद्रांवरील नोंदीनुसार ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस हवेचा दर्जा खालावल्याचे दिसून आले होते. मुंबईतील काही भागात अतिवाईट हवेची नोंद झाली. वातावरणातील घातक पीएम २.५ आणि पीएम १० धूलीकणांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. मात्र, आता हवेचा दर्जा खालावत असल्याचे दिसते आहे.

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
temperature declined in central Maharashtra
उत्तर महाराष्ट्र गारठला, मध्य महाराष्ट्रातील पारा खाली
minimum temperatures in mumbai reached 18 degrees on tuesday
Mumbai Weather Today : तापमानाचा पारा वाढला
minimum temperatures in north Maharashtra
Maharashtra Weather Update : थंडीत आणखी वाढ होणार ? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठीचा अंदाज
mumbai, Coldest December, minimum temperature
मुंबई : नऊ वर्षांतील थंड डिसेंबर
price of potatoes increased up to rs 10 per kg due to supply restrictions from west bengal
उत्तरेत ऐन थंडीत बटाटा तापला; पश्चिम बंगालने राज्याबाहेर बटाटा, कांदा विक्री, वाहतुकीस घातली बंदी

हेही वाचा >>>महिला पोलिसांवर पोलिसांनीच बलात्कार केल्याच्या आरोपांचं खळबळजनक पत्र व्हायरल, कुणाची नावं? प्रकरण काय?

मुलुंड येथे सोमवारी सायंकाळी समाधानकारक हवेची नोंद झाली. तेथे हवा गुणवत्ता निर्देशांक ८६ नोंदवला गेला. कुर्ला येथे ८७, कुलाबा ९३, भायखळा ८५, माझगाव ९५, बोरिवली ९३, अंधेरी ९१, चेंबुर येथील ९७ होता. तसेच मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ९८ इतका नोंदला गेला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रणाच्या निकषांनुसार हवा गुणवत्ता निर्देशांकातील ०-५० म्हणजे चांगले, ५१-१०० मधील समाधानकारक, १०१-२०० दरम्यान मध्यम, २०१-३०० वाईट, ३०१-४००पेक्षा जास्त म्हणजे अतिधोकादायक समजला जाते.

मुंबई शहरात धुलीकणांचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण लक्षात घेऊन मुंबई महापालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई करण्यात आली. पालिकेकडून वेळोवेळी रस्ते, पदपथ पाण्याने धुण्यात आले.दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवेच्या गुणवत्तेत लक्षमीय सुधारणा झाली असून अनेक भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक जवळपास ५० टक्क्यांनी सुधारला आहे.

Story img Loader