दहिसर येथील इस्टेट एजंट महेश शुक्ला यांच्या हत्येच्या निषेधार्थ शिवसेनेने मंगळवारी मोर्चा काढला.  या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन कडक कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मागील आठवडय़ात दहिसरच्या आंबेवाडी  येथे राहणाऱ्या शुक्ला याचे अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली होती, असा संशय यासंदर्भात व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.  
या मोर्चात मृत शुक्लाच्या आईसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. उर्वरित दोन्ही आरोपींना लवकरच अटक केली जाईल तसेच अटक केलेल्या आरोपींना जामीन मिळणार नाही, असे आश्वासन सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल देशमुख यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.      

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In agaisnt of murdered of estate agent shivsena takes morcha