मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनावर कारवाई केल्याच्या रागातून दोन तरूणांनी पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात घडला. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात अंधेरीमधील डी. एन. नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, पोलिसासोबत वाद घालणे आदी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

अंधेरीमधील जे. पी. रोड, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, वाडिया महाविद्यालयाजवळ रविवारी ही घटना घडली. पोलीस शिवाई प्रमोद बाबासाहेब पालवे डी. एन. नगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. वाडिया हायस्कूलजवळ रविवारी दुपारी काही वाहने बेकायदेशीरपणे उभी करण्यात आली होती. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.

हेही वाचा…पर्यावरणपूरक फटाकेही घातकच, बेरियम, सल्फर, कॉपर रसायनांचा वापर

i

त्यामुळे प्रमोद पालवे यांनी तेथे उपस्थित वाहनचालक सचिन यादव आणि प्रकाश हालीकडे यांना तेथून वाहने काढण्यास सांगितले. यावरून सचिन आणि प्रकाशने पालवे यांच्याशी वाद घातला. तसेच त्यांना धक्काबुक्कीही करीत सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पालवे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांत दोघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.