मुंबई : आंध्र प्रदेशामधील संगमेश्वरमजवळील समुद्रात मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकून १३८ ऑलिव्ह रिडले कासवांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. मासेमारीचे जाळे अनधिकृतपणे लावण्यात आले होते, असा आरोप ट्री फाऊंडेशन या संस्थेकडून करण्यात आला आहे. सध्या राज्याच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवर सागरी कासवांच्या विणीचा हंगाम सुरू आहे. ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची मादी अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येत आहेत. त्यातच आंध्र प्रदेशमधील कृष्णा तालुक्यातील संगमेश्वरम किनाऱ्यावर सागरी कासवांच्या मृत्यूची घटना उघडकीस आल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. संगमेश्वरम किनाऱ्यालगत पाकट (स्टिंग रे) मासे पकडण्यासाठी जाळी लावण्यात आली होती. ओडिशा, आंध प्रदेश या राज्यांमध्ये कासवांच्या विणीच्या काळात किनाऱ्यालगत मासेमारी करणे बेकायदा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सन्मानाने मरण्याचा अधिकार – लिव्हिंग विल, इच्छुकांसाठी योग्य ती यंत्रणा उपलब्ध; ३८८ अधिकाऱ्यांची नियुक्ती

स्टिंग रे मासे पकडण्यासाठी किनाऱ्यालगत लावलेल्या जाळ्यांमध्ये अंडी घालण्यासाठी येऊ पाहणारी अनेक मादी कासवे अडकली. जाळ्यात अडकल्याने सुमारे १३८ ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. या कासवांच्या पोटात १०० हून अधिक अंडी सापडली. ट्री फाऊंडेशनने समाज माध्यमांवर पोस्ट करून यासंदर्भातील माहिती दिली. दरम्यान, सध्या कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी सागरी कासव येत आहेत. मात्र, या काळात किनारपट्टीभागात मासेमारी करण्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. आतापर्यंत राज्यात जाळ्यात अडकून मोठ्या संख्येने कासवांचा मृत झाल्याच्या घटना घडलेल्या नाहीत.आंध्र प्रदेशामधील संगमेश्वरमजवळील समुद्रात जाळ्यात अडकल्याने सुमारे १३८ ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. या कासवांच्या पोटात १०० हून अधिक अंडी सापडली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In andhra pradesh sangameshwar sea 138 olive ridley sea tutle found dead mumbai print news css