मुंबई: शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी भांडुप परिसरात मतदारांना दाखवण्यासाठी कागदाने तयार केलेली मतदान यंत्रे टेबलावर ठेवली होती. त्यावरून भांडुप पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून पोलीस त्यांच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा – मुंबईत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी विवध ठिकाणी गुन्हे दाखल
हेही वाचा – मुंबई : मतदान यादी क्रमांकामुळे मतदारांमध्ये संभ्रम
भांडुप तलाव परिसरात सोमवारी सकाळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांनी मतदारांना दाखवण्यासाठी पोलिंग बूथवर कागदाने तयार केलेली यंत्रे ठेवली होती. त्याठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिंग बूथवर धाव घेत यंत्रे ताब्यात घेतली. तसेच ती यंत्रे तेथे ठेवणाऱ्या दोन कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. ही माहिती आमदार सुनील राऊत यांना मिळाल्यानंतर त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांशी त्यांचा काही वेळ वाद झाला. शंभर मीटरच्या बाहेर कार्यकर्ते मतदारांना जागृत करत होते. त्यामुळे त्यांना तत्काळ सोडून देण्यात यावे अशी मागणी राऊत यांनी केली.