स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज उलटा फडकविल्याप्रकरणीे कस्तुरबा मार्ग पोलिसांनी तिघांना अटक केलीे आहे. या तिघांना अटक करून नंतर जामिनावर सोडून देण्यात आले.बोरिवली येथील देवीपाडा परिसरात उलटा राष्ट्रध्वज फडकत असल्याचीे माहितीे मिळाल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले.बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीेवर तिघांनी हा राष्ट्रध्वज फडकवला होता. मात्र तो उलटा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी चौकशीे करून या तिघांना अटक केलीे.तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

Story img Loader