खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. ‘अजित पवार महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आहेत. आज ना उद्या अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल,’ असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं होतं. या वक्तव्यावर शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे.
प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले?
नागपुरात प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार? असा प्रश्न प्रफुल्ल पटेल यांना विचारला. त्यावर पटेल यांनी म्हटलं की, “आज ती जागा रिकामी नाही. मग चर्चा कशाला करताय? आज अजित पवार महाराष्ट्रातील एक वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत.”
हेही वाचा : “सावित्रीबाईंबद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांना भररस्त्यात फाशी दिली पाहिजे, पण…”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
“आमच्या पक्षाचे नेतृत्व अनेक वर्षापासून ते करत आले आहेत. त्यामुळे आज ना उद्या अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल,” अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती.
हेही वाचा : विधीमंडळात गोपीचंद पडळकरांनी कागद फाडले; उपसभापतींना धमकी? नेमकं काय घडलं?
याविधानावर ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं, अजित पवार भविष्यात मुख्यमंत्री होतील. भविष्यात निश्चित अजित पवार निश्चित मुख्यमंत्री झाले पाहिजेत. पण, २०२४ पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. आणि भविष्यात म्हणजे ५ ते १० वर्षानंतरही अजित पवार मुख्यमंत्री होतील. ते आता कसे वर्तवला येईल.”