मुंबईः घाटकोपर पश्चिम येथे किरकोळ वादातून दोघांवर बांबू व धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यात एकाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

या हल्ल्यात रतन डोळसे (४२) यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचा मेहुणा सुनील पट्टेकर (३६) जखमी झाला आहे. घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून प्रकाश पोटे ऊर्फ गोट्या (४६), वैशाली मेहंदळे (४६) व करण कांबळे (१९) यांना अटक केली आहे. याशिवाय याप्रकरणी आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. सुनील पट्टेकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Walmik Karad News
Walmik Karad : वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल; सोशल मीडियावर रंगल्या ‘या’ चर्चा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Nawab Malik and sameer Wankhede
Sameer Wankhede : नवाब मलिकांना दिलासा; समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी सादर केला क्लोजर रिपोर्ट!
Mumbai, man murdered Kanjurmarg,
मुंबई : कांजुरमार्ग येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा खून, मेट्रो कारशेड परिसरात सापडला होता मृतदेह
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Suresh Dhas on Viral CCTV FOotage
Suresh Dhas : वाल्मिक कराडच्या ‘त्या’ सीसीटीव्ही फुटेजवर सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझे आरोप…”
Gujarat diamond factory manager dies during rape bid of 14-yr-old girl
Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करताना ४१ वर्षीय माणसाचा मुंबईत मृत्यू, पीडितेला करत होता ब्लॅकमेल
On tuesday morning police found dead body of woman at Dream Mall on lbs road in Bhandup West
भांडुपमधील ड्रीम मॉलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

हेही वाचा – Sameer Wankhede : नवाब मलिकांना दिलासा; समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी सादर केला क्लोजर रिपोर्ट

हेही वाचा – मुंबई : बीकेसी येथे वाहतुकीत बदल, वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतुकीत बदल

तक्रारीनुसार, सुनील पट्टेकर हा घाटकोपर पश्चिम येथील भटवाडी येथील रहिवासी आहे. त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या प्रकाश पोटेविरोधात त्याचा वाद झाला. त्यातून पोटे व त्याच्यासोबत इतर व्यक्तींनी जमा होऊन सुनील यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. मृत रतन डोळसेही घरात उपस्थित होते. आरोपींनी दोघांवरही बांबू व धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात सुनील यांच्या डोक्यावरही गंभीर दुखापत झाली आहे. डोळसे यांच्याही डोक्यावर व हातावर गंभीर जखमा आहेत. त्यांना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन आरोपींना राहत्या परिसरातून अटक करण्यात आली. तर उर्वरीत दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

Story img Loader