मुंबई : मध्य रेल्वेवरील दिवा-वसई रोड विभागातील पुलाच्या तुळया उभारणीसाठी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात रात्रकालीन वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दिवा – वसई रोड दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिवा आणि वसई रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर पूल क्रमांक ४५/२ आणि ४५/३ साठी तुळया उभारण्यात येणार आहेत. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी हे ब्लॉक नियोजित केले आहेत. दिवा – कोपरदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर १२ जानेवारी, १९ जानेवारी २६ जानेवारी आणि २ फेब्रुवारी रोजी रात्री ११.१५ ते पहाटे ५.१५ वाजेपर्यंत ६ तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकच्या वेळी गाडी क्रमांक ६१००४ दिवा-वसई रोड, गाडी क्रमांक ६१००५ वसई रोड-दिवा, गाडी क्रमांक ६१००६ दिवा-वसई रोड, गाडी क्रमांक ६१००७ वसई रोड-दिवा या रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

हेही वाचा : …अन् राज ठाकरे यांनी घरी बोलावले; गंधर्व कलामंचच्या कलाकारांचे कौतुक

सर्व ब्लाॅकच्या दिवशी गाडी क्रमांक २२१९३ दौंड-ग्वाल्हेर दोन तासांसाठी, गाडी क्रमांक ११०४९ अहमदाबाद-कोल्हापूर १५ मिनिटांसाठी आणि १९ जानेवारी, २ फेब्रुवारीच्या ब्लाॅक दिनी गाडी क्रमांक १२२९७ अहमदाबाद-पुणे ४५ मिनिटांसाठी दिवा-वसई रोड विभागादरम्यान थांबवण्यात येणार आहेत.