मुंबई : महादेव बुक बेटिंग अ‍ॅपप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेता साहिल खानसह चौघांना समन्स पाठवले होते. त्यावर साहिलने पोलिसांशी संपर्क साधून परदेशात असल्यामुळे चौकशीला उपस्थित राहण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. सोबत साहिलने कोणताही पुरावा पाठवला नसल्यामुळे मुंबई पोलिसांना त्याच्या दाव्यावर विश्वास नसल्याचे सूत्रांनी सांगितले. हे संपूर्ण प्रकरण १५ हजार कोटी रुपयांचे असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेने अभिनेता साहिल खान, त्याचा भाऊ सॅम आणि दुसरा आरोपी हितेश खुशलानी यांनाही समन्स बजावले होते. पण त्यातील कोणीही चौकशीला उपस्थित राहिले नाही. तसेच साहिल खान सोडून इतर कोणी पोलिसांशी संपर्कही साधला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी आरोपी पलायन करण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस ‘लुक आउट सर्कुलर’ (एलओसी) जारी करण्याबाबत विचार करत आहेत.

scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक

हा संपूर्ण गुन्हा महादेव अॅपशी संबंधित खिलाडी अ‍ॅपसंदर्भात आहे. प्रकाश बनकर यांच्या तक्रारनुसार आरोपी चंद्राकर आणि इतर आरोपी मॅच फिक्सिंगमधून नफा कमावण्याच्या अप्रामाणिक हेतूने भारतात आयोजित केलेले प्रमुख क्रिकेट सामने व मालिकांचे निकाल निश्चित करण्यासाठी सक्रियपणे सहभागी होते. त्यात परदेशातील साथीदारांचाही सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच चंद्राकर मॅच फिक्सिंगसाठी लंडनमधील दिनेश खंबाट आणि चंदर अग्रवाल यांच्यामार्फत काम करतो, असा आरोप तक्रारीत केला आहे. त्यांची नावेही तक्रारीत नमूद केली आहेत. अमित शर्मा नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून बेटिंगची सर्व संकेतस्थळे चालवण्यात येतात. आरोपींनी जानेवारी २०१९ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत एकूण १५ हजार कोटींचा जुगार आणि सायबर फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ३१ जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.