मंबई : आरोग्य विभागाला अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात निधी मिळाला पाहिजे हे प्रत्येक पक्ष मान्य करत असला तरी सत्तेवर आल्यानंतर प्रत्यक्षात अर्थसंकल्पात आरोग्य विभागाला निधी वाटपात तोंडाला पाने पुसली जात असल्याचे मागील काही वर्षातील चित्र यंदाच्या अर्थसंकल्पातही कायमच राहिले. यंदाच्या २०२५-२६च्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाने ११,७२८ कोटी रुपयांची मागणी केली होती मात्र प्रत्यक्षात अर्थमंत्री अजित पवार यांनी केवळ ३,८२७ कोटी रुपये आरोग्य विभागासाठी मंजूर केले. परिणामी आरोग्य विभागाचे नवीन उपक्रम राबविणे दूरच राहिले आहे त्या योजनांसाठी खर्च कसा करायचा हा प्रश्न आरोग्य विभागापुढे निर्माण झाला आहे. पायाभूत सुविधांसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करणारे अर्थमंत्री गोरगरीबांच्या आरोग्यासाठी अपुरी तरतूद कशी करू शकतात, असा सवाल आरोग्य विभागातील ज्येष्ठ डॉक्टरांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा