मुंबई : स्तनाचा कर्करोग हा आता तरुणींमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तीस आणि चाळीशीच्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान वाढत असल्याचे निर्दशनात आले असून या आजारामुळे २०४० पर्यंत दरवर्षी एक लाखांहून महिलांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. ‘लॅन्सेट’मधून ही बाबसमोर आली असून अहवालात म्हटले की २०१६ ते २०२२ याकाळात जगभरात सुमारे ७८ लाख महिलांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले तर सुमारे ६,८५,००० महिलांचा या आजाराने मृत्यू झाला. भारतात तरुण महिलांमधील स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण गेल्या दोन दशकात वाढताना दिसत असून योग्य काळजी व नियमित तपासणी केल्यास याला अटकाव करता येऊ शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारतात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २०२० मध्ये २३ लाख इतके होते ते वाढून २०४० पर्यंत ३० लाखांपर्यंत जाण्याचा इशारा लॅन्सेट अहवालात दिला असून स्तनाच्या कर्करोगामुळे उद्भवणाऱ्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडेही यात लक्ष वेधण्यात आले आहे.पाश्चिमात्या देशांपेक्षा आशियाई देशात तसेच भारतात स्तानाच्या कर्करुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत असून आशिया खंडात ४० वर्षांखालील महिलांमध्ये हे प्रमाण २३ टक्के इतके असून युरोप व अमेरिकेत हेच प्रमाण दोन ते तीन टक्के असल्याचे हिंदुजा रुग्णालय व रहेजा रुग्णालयातील विख्यात कॅन्सरशल्यचिकित्सक डॉ. संजय दुधाट यांनी सांगितले. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा, सिगारेट व अल्कोहोलचे सेवन, जीवनशैलीतील बदल तसेच हार्मोनल असमतोलता व अनुवांशिकता ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे डॉ. दुधाट म्हणाले. आशियाई देशांत, प्रामुख्याने भारतामध्ये हा कर्करोग तरुण स्त्रियांमध्ये (२५ ते ४५ वर्षे) होण्याचे प्रमाण मागील दोन दशकांपासून सतत वाढत आहे, ही खरी चिंतेची बाब आहे. आपल्या देशामध्ये स्तनाचा कर्करोग हा महिलांमधील एक सर्वाधिक आढळणारा आजार ठरु पाहत आहे. महिलांमध्ये सर्व प्रकारच्या कर्करोगात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २५ ते ३२ टक्के आहे. ‘आयसीएमआर’च्या अहवालानुसार आपल्या देशात २०२० साली १,७८,००० नवीन स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांची नोंद झाली. सुमारे ६० ते ७० टक्के रुग्णांचे निदान हे रोग अंतिम टप्प्यात आल्यानंतर होत असल्यामुळे स्तनाच्या कर्करोगापासून होणा-या मृत्यूचे आपल्या देशातील प्रमाण पाश्चात्य देशांपेक्षा जास्त आहे.

Tata Hospital to start super specialty hospital for cancer
कर्करोग रुग्णांसाठी टाटा रुग्णालय सुरू करणार अतिविशेषोपचार रुग्णालय
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
ladki bahin yojana
नाशिक: बँकेतील रांगेमुळे गरोदर महिलेचा मृत्यू
Cancer Radiation Chemotherapy Cancer Free Life Vandana Atre
कर्करोगाला रामराम ठोकताना…
state has 127 gbs patients with two deaths reported
‘जीबीएस’ची रुग्णसंख्या १३० अन् आतापर्यंत २ मृत्यू; आरोग्य सचिवांकडून यंत्रणांची झाडाझडती
Sasoon Hospital Pune.
‘GBS’मुळे आणखी एक मृत्यू, पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात नोंद; राज्यातील रुग्णसंख्या १२७ वर
number of Guillain Barre Syndrome GBS patients in state has reached 101 of which 16 patients are on ventilators
जीबीएसच्या रुग्णांत मोठी वाढ अन् एकाचा मृत्यू! रुग्णसंख्या शंभरपार; निम्म्याहून अधिक ‘आयसीयू’त
inspection campaign, breast cancer , cervical cancer ,
स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी तपासणी मोहीम राबवा – आरोग्यमंत्री

हेही वाचा : Malegaon Blast Case : “२५ एप्रिलला हजर रहा, अन्यथा..”, न्यायालयाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांना काय सांगितलं?

तरुण स्त्रियांमध्ये वाढत्या कर्करोगाशी मुकाबला करताना, आपण जास्त धोका असलेल्या तसेच अनुवंशिकता असलेल्या महिलांना शोधणे व त्यांचे जेनेटिक कौन्सिलिंग करणे गरजेचे आहे. २० वर्षापासून स्तनाची स्वपरिक्षा या विषयाबद्दल सर्वत्र जागरुकता निर्माण करायला हवी. चांगल्या सवयी, चांगले विचार, उत्तम सकस आहार, व्यायाम, योगा व मनन चिंतन, चांगली जीवनशैली अंगीकारा म्हणजे आपले शरीर व मन निरोगी राहण्यास मदत होईल. स्तनाच्या कर्करोगाचे अगदी लवकर निदान झाल्यास रुग्ण पूर्णत: बरे होतात व त्यापासून होणा-या मृत्यूचे प्रमाणही कमी होईल, असेही डॉ. संजय दुधाट यांनी सांगितले. स्त्रांयांनी प्रामुख्याने लठ्ठपणावर (ओबेसिटी) जास्त लक्ष देऊन वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे असल्याचेही डॉ दुधाट यांनी आवर्जून सांगितले.

आकडेवारीनुसार जगभरात दर चार मिनीटाला एक स्तनाच्या कर्करोगाचा रुग्ण सापडतो तर दर १३ व्या मिनीटाला एका महिलेचा मृत्यू या आजाराने होतो. भारतात २२ महिलांपैकी एका महिलेला आयुष्यात हा कर्करोग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या प्रमाणात २०३० पर्यत २६ टक्क्यांनी वाढ होर्ईल असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. यामागे कर्करोगाचे आपल्याकडे उशिरा होणारे निदान, जीवनशैलीतील बदल, लठ्ठपणा, उशीरा होणारे लग्न, मुल न होऊ देणे, स्तनपान करण्यास असलेला विरोध अशी अनेक कारणे आहेत. दोन दशकांपासून साधारणपणे २५ ते ४० वयोगटातील महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण सतत वाढताना दिसत आहे. दोन दशकांपूर्वी वर्षापूर्वी भारतात स्तनांच्या कर्करोगाचा आजार हा ५० वयानंतर होताना दिसत होता मात्र आता ४८ टक्के रुग्ण हे पन्नास वर्षाखालील आहेत.

हेही वाचा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांचा वेग वाढणार, बोरघाटात आता ताशी ६० किमी वेगाने वाहने धावणार

स्तनाच्या कर्करोगाची कारणाध्ये वाढत्या वयात होणारे लग्न, लहान वयात मासिक पाळी येणे (बारा वर्षा आधीपासून), वयाच्या पन्नाशी नंतर मासिक पाळी बंद होणे, दीर्घकाळाने मूल होणे (तीस ते पस्तीशी नंतर), अविवाहीत किंवा अपत्यहीन स्त्रियांमध्ये धोका जास्त, स्थूलपणा, आहारात अतिस्निग्ध पदार्थांचा वापर, धूम्रपान आणि अति-मद्य सेवन. स्तनाच्या कर्करोगांमध्ये अनुवंशिकता हे एक महत्वाचे कारण आहे. स्तनाच्या कर्करोगाची प्राथमिक लक्षणे, वेदनारहित गाठ, स्तनाग्रातून रक्तस्त्राव होणे, स्तनाग्र आत ओढले जाणे, स्तनावर जास्त लाली येणे, स्तनामध्ये काही ठिकाणी जाडपणा येणे आदी असून अनुवंशिक कारणामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. जवळच्या रक्ताच्या नातेवाईकामध्ये (अनुवंशिकता) जर हा आजार असेल तर त्या कुटूंबातील इतर स्त्रियांना याचा धोका जास्त वाढतो असे केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता व हिंदुजाचे संचालक डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले. वेळेत लक्ष दिल्यास हा आजार बरे होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी स्वपरीक्षा करणे, फॅमिली हिस्ट्री असल्यास नियमित तपासणी करणे,तसेच चाळीशीनंतर प्रत्येक महिलेने नियमित तपासणी केली व पहिल्या टप्प्यात हा आजार लक्षात आल्यास ९० रुग्ण बरे होऊ शकतात असेही डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले.

हेही वाचा : मोठी बातमी! मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग, परिसरात धुराचे लोट

तरुण स्त्रियांमध्ये जनुकांमधील बदलामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते. ट्रिपल निगेटीव्ह स्तनाच्या कर्करोगामध्ये अशी शक्यता जास्त असते. अशा कुटूंबामध्ये जेनेटिक कौन्सेलिंगची अत्यंत गरज असते. अशा जास्त धोका असणा-या स्त्रियांची योग्य पध्दतीने तपासणी होणे गरजेचे आहे. यासाठी मॅमोग्राफी, एमआरआय मॅमोग्राफी करणे आवश्यक ठरते. ४० हून कमी वयाच्या या महिलांमध्ये मॅमोग्राफी चाचणीत स्तनाच्या घनतेमुळे निदान करणे कठीण जाते. या स्त्रियांसाठी ब्रेस्ट सोनोग्राफी व एम.आर.आय. मॅमोग्राफीची मदत घेतली जाते. स्तनाची स्वपरिक्षा ही सुध्दा स्तनाच्या कर्करोगाचे निदान होण्यासाठी अत्यंत महत्वा असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. वेळीच हा आजार लक्षात आल्यास अनेक चांगल्या प्रकारचे इलाज या रोगावर आहेत. यात शस्त्रक्रिया, केमोथेरपी, टारगेटेड थेरपी, इम्युनो थेरपी, रेडिएशन थेरपी व हॉर्मोनल थेरपी. शस्त्रक्रियामध्ये, स्तन संपूर्ण काढणे अथवा मर्यादित शस्त्रक्रिया करून स्तन वाचविला जातो. अनुवाशिंक आजार असलेल्यांनी तीशीनंतर तसेच अन्य महिलांनी चाळीशीत नियमित तपासणी करणे आवश्यक असून वेळीच निदान झाल्यास मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊ शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Story img Loader