मुंबई : वेदान्त-फॉक्सकॉनपाठोपाठ अन्य काही प्रकल्प गुजरातमध्ये गेले असा अपप्रचार विरोधक करीत आहेत. उलटपक्षी महायुती सत्तेवर आल्यानंतर राज्यातील उद्योगधंद्याला चालना मिळाली असून गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील उद्योगधंद्यांमधील गुंतवणूक वाढत आहे. मागील काही महिन्यांत राज्यातील उद्योगधंद्यांत दोन लाख कोटींहून अधिक गुंतवणूक झाली आहे. अनेक मोठे प्रकल्प राज्यात आले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील औद्योगिक विश्वाचा वेध घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘उद्योगराष्ट्र’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रकाशन सोहळ्याला खासदार श्रीकांत शिंदे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर उपस्थित होते.

हेही वाचा : “देवेंद्र फडणवीस हेच ‘फेक नरेटिव्ह’चं महानिर्मिती केंद्र”; सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

तळेगाव, पुणे येथे वेदांता – फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्यात येणार होता. या प्रकल्पाच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक लाख ५४ हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. मात्र हा प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. तर यानंतर टाटा एअरबस आणि अन्य काही प्रकल्पही परराज्यात गेले. यावरून महाविकास आघाडीने महायुतीला लक्ष्य केले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपास सुरुवात झाली. आजही राज्यातील उद्याोग परराज्यात वळविले जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून होत आहे. मात्र हा निव्वळ अपप्रचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मागील काही महिन्यांत राज्यातील उद्याोगविश्वात दोन लाख कोटींहून अधिकचे करार करण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यामध्ये दोन लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्याोग घटकांचा समावेश असलेल्या ५० हजार कोटींच्या प्रकल्पासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प असल्याचे ते म्हणाले. हे सर्व प्रकल्प येत्या काळात राज्याच्या औद्याोगिक विकासाला चालना देतील. या प्रकल्पांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

कोट्यवधींचे प्रकल्प

टॉवर सेमीकंडक्टर, नवी मुंबई (८३,००० कोटी)

स्कोडा फोक्सवागेन, चाकण (१५,००० कोटी)

टोयोटा किर्लोस्कर, छत्रपती संभाजीनगर (२१,००० कोटी)

इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क, महापे (२,००० कोटी)

इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर, पुणे (२,००० कोटी)

पीएम मित्रा पार्क, अमरावती (१०,००० कोटी)

हेही वाचा : Baba Siddique : “बाबा सिद्दीकी यांची हत्या ही चिंतेची बाब, एक मोठं षडयंत्र…”, किरीट सोमय्यांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी

बीडकीन औद्योगिक क्षेत्र (५२,००० कोटी)

कोकण औद्योगिक क्षेत्र (१०,००० कोटी)

कॅश्यू पार्क, रत्नागिरी (४,५०० कोटी)

शासनाचा बल्क ड्रग पार्क, रायगड (२,२४२ कोटी)

चेहरामोहरा बदलणारा प्रकल्प!

पालघरमधील वाढवण बंदर प्रकल्प राज्याचा चेहरामोहरा बदलून टाकणआर प्रकल्प ठरणार आहे. या बंदराच्या अनुषंगाने आसपासच्या शहरात अनेक छोटे, मोठे उद्याोग निर्माण होणार आहेत. औद्याोगिक विकासाच्या या संधी लक्षात घेत वाढवण बंदराला राज्याच्या कानाकोपऱ्याशी जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. समृद्धी महामार्ग वाढवणशी जोडण्यासाठी इगतपुरी – वाढवण दरम्यान समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने…”

उद्योगधंदे परराज्यात जात असल्याचा अपप्रचार करणाऱ्यांच्या कार्यकाळातच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्याचे निश्चित झाले होते. हा प्रकल्प राज्यातच राहावा यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. याउलट महायुतीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक व्हावी, नवीन प्रकल्प यावेत यासाठी प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांमुळेच सध्या राज्यातील उद्याोगधंद्यांना चालना मिळाली आहे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

●मुख्य प्रायोजक :महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

●सहप्रस्तुती : सिडको

●साहाय्य : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, महानिर्मिती

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra more than 2 lakh crores invested in industries says cm eknath shinde css