मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांपैकी कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला ४ जुलैपासून सुरूवात झाली. त्यापाठोपाठ सीईटी कक्षाकडून अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या. यामध्ये तंत्रशिक्षण विभागाच्या १० अभ्यासक्रमांचा आणि उच्च शिक्षण विभागाच्या आठ अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या संभाव्य तारखा आहेत.
६ जुलैला एमसीए, ८ जुलै रोजी एलएलबी ५ वर्ष, बीए,बीएससी-बी.एड, बी.एड-एम.एड, ९ जुलै रोजी एमबीए, एमएमएस, एमई,एम. टेक, एम. आर्च, १० रोजी बीई,बी. टेक, एलएलबी ३ वर्ष, ११ जुलै रोजी बी.फार्मसी, फार्म डी, बी.एचएमसीटी, बी.पी. एड, एम.पी. एड, १२ जुलै रोजी बी.डिजाइन तर बी. एड, एम.एड, १३ जुलैला एम. फार्म, एम. एचएमसीटी आणि १६ जुलै रोजी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, थेट द्वितीय वर्ष औषध निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.