मुंबई : तीनचाकी आणि चारचाकी हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस स्वरूपात वाहन वितरक यांच्या स्तरावरच ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा गुरुवारपासून उपलब्ध करण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व परिवहन विभागाच्या कार्यालयांसाठी ही सुविधा कार्यान्वित केली आहे. तसेच ही सुविधा सर्व वाहन वितरकांकडे उपलब्ध असेल. या नव्या बदलामुळे वाहनधारकांच्या आरटीओ कार्यालयात खेटे घालणे बंद होईल. या सुविधेमुळे वार्षिक ६५ हजारांहून अधिक वाहनधारकांना लाभ होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मोबाइल घेण्यावरून झालेल्या वादातून शेजाऱ्याची हत्या

सद्यस्थितीत खासगी वाहनांप्रमाणे हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी या सुविधेमुळे वाहन वितरकांकडे करणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता हलकी मालवाहू वाहने यापुढे परिवहन कार्यालयात नोंदणीसाठी आणण्याची आवश्यकता नाही. नोंदणीची प्रक्रिया सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. ही सेवा पूर्णपणे फेसलेस स्वरूपाची असून वाहन वितरकांना त्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर वाहन मालकाचा वाहन नोंदणी अर्ज करावा लागणार आहे. तसेच वाहन नोंदणी शुल्क व वाहन कराचा भरणा करून नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra rto registration small loading vehicles now online mumbai print news css