मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची विेशेष न्यायालयाने दखल घेतली. तसेच, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्ता तनपुरे आणि त्यांचे वडील प्रसाद तनपुरे यांना समन्स बजावले. काँग्रेस नेते रणजीत देशमुख, शिवसेना नेते अर्जुन खोतकर, बांधकाम व्यावसायिक जुगल किशोर तापडिया आणि उद्योगपती पद्माकर मुळ्ये यांच्यासह या प्रकरणातील अन्य आरोपींनाही विशेष न्यायालयाने यावेळी समन्स बजावले आहे. त्याचप्रमाणे, या सगळ्यांना १२ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. आर्थिक गैरव्यवह प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) व्याख्येनुसार आरोपींनी या प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे दर्शवणारे सकृतदर्शनी पुरावे असल्याचेही न्यायालयाने उपरोक्त आरोपींना समन्स बजावताना नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ईडीने या प्रकरणी दाखल केलेल्या दोन पुरवणी आरोपपत्रांची विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी शनिवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी दखल घेतली. तसेच, आरोपींना समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश दिले. तनपुरे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च आणि तंत्रशिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री होते. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे माजी खासदार आहेत.

हेही वाचा… कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे १००टक्के आरक्षण

हे प्रकरण सहकारी साखर कारखाने आणि सहकारी सूत गिरण्यांमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने ऑगस्ट २०१९ मध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवला होता. त्याच्या आधारे ईडीने या प्रकरणी कारवाई केली होती. ईडीच्या आरोपानुसार, प्राजक्त तनपुरे यांच्या प्रसाद शुगर ॲण्ड अलाईड ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड या कंपनीला राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना हा २६.३२ कोटी रुपयांऐवजी केवळ १२.९५ कोटी रुपयांना विकला गेला. हा कारखाना बेकादेशीररीत्या विकत घेण्यात आला आणि त्यातील पैसे हे आर्थिक गैरव्यवहाराचे असल्याचेही विशेष न्यायालयाने पुरवणी आरोपपत्रांची दखल घेताना नमूद केले.