मुंबई : करोनाकाळानंतर उपनगरी रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची गर्दी वाढू वाढल्याने अपघातात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गर्दीने तुडुंब भरलेल्या धावत्या गाडीतून पडून बुधवारी सकाळी दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. गेल्या नऊ वर्षांत ११,३१६ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी ठरलेली उपनगरी रेल्वेसेवेवरील प्रवास मुंबईकरांसाठी असुरक्षित ठरू लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८.३० या वेळेत प्रचंड गर्दी असते. यावेळी रेल्वेगाडीत शिरण्यास जागा मिळत नसल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करतात. मध्य रेल्वेवरील गाड्या विलंबाने धावत असल्याने इच्छितस्थळी वेळेत पोहोचण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, काही वेळा गाड्यांमधील गर्दीच्या रेट्याने दरवाजावरील प्रवासी बाहेर फेकले जातात. त्यात अनेकांना स्वत:चा जीव गमवावा लागतो.

हेही वाचा : मुंबईच्या किमान तापमानात चढ – उतार सुरुच

याशिवाय रेल्वे रुळ ओलांडताना प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो. बुधवारी सकाळी विलेपार्ले येथे रेल्वे रूळ ओलांडताना एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर, कल्याण – डोंबिवलीदरम्यान एक महिला व एक पुरूष प्रवासी पडून त्यांचा मृत्यू झाला. रूळ ओलांडून धोका पत्करतात. हे प्रकार टळावे यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती केली जाते, असे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितले.

“गर्दीतून प्रवाशांची मुक्तता व्हावी यासाठी ‘शून्य मृत्यू मोहीम’ राबवण्यात येत आहे. मुंबईतील संस्थांना कार्यालयीन वेळा बदलण्यास पत्रव्यवहार केला आहे. यापैकी अनेक संस्थांनी पाठिंबा दिला आहे. येत्या काळात लोकलमधील गर्दीचा लोंढा कमी होईल.” -डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

हेही वाचा : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या वांद्र्यातील घरात चोरी, लग्नात मिळालेले सहा लाखांचे दागिने लंपास; पोलिसांनी केली ‘या’ व्यक्तीला अटक

“रेल्वेतून पडून होत असलेल्या मृत्यूला गर्दी कारणीभूत आहे. मात्र सर्वसामान्य प्रवाशांचा मृत्यू होणे ही बाब गौण असल्याचा समज प्रशासनाने करून घेतल्याचे वाटत आहे. उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवणे, त्या वेळेत चालवणे आवश्यक आहे.” – लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ