मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची पहिली विशेष प्रवेश यादी सोमवारी जाहीर करण्यात आली असून त्यात विविध महाविद्यालयांतील १ लाख ९७ हजार ६४८ जागांसाठी १ लाख ३ हजार १५४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ९० हजार ४०० विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. पहिल्या विशेष फेरीत अर्ज केलेल्या १२ हजार ७५४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळण्याची प्रतीक्षा आहे. तब्बल ६५ हजार ५०१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, १० हजार ७३३ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे आणि ५ हजार २९२ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय देण्यात आले आहे.

पहिल्या तीन नियमित प्रवेश फेऱ्यांच्या तुलनेत नामांकित महाविद्यालयांतील प्रवेश पात्रता गुण हे (कट ऑफ) नव्वदीच्या उंबरठ्यावरच राहिले होते. मात्र, पहिल्या विशेष प्रवेश फेरीत नामांकित महाविद्यालयातील प्रवेश पात्रता गुणांत मोठी घट झाली आहे. कला शाखेसाठीच्या प्रवेश पात्रता गुणांत ५ ते ७ टक्के, वाणिज्य शाखेसाठीच्या प्रवेश पात्रता गुणांत २ ते ३ टक्के आणि विज्ञान शाखेसाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये ४ ते ५ टक्क्यांची घट झालेली आहे. सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे काही महाविद्यालयांची संबंधित शाखांसाठीची पहिली विशेष प्रवेश यादी जाहीर झालेली नाही.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
state government decision 50 thousand teachers will get 20 percent subsidy increase
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Lok Adalat held for first time in 33 years in history of Maharashtra Administrative Tribunal ( mat )
‘मॅट’च्या इतिहासात प्रथमच लोक अदालत,१२६ जणांना नोकरी
Central Railway security rescued 1099 children in 11 months with police and employee coordination
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ ; रेल्‍वे सुरक्षा दलाने अकराशे मुलांची केली सुटका
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल

हेही वाचा : Milind Deora : मिलिंद देवरांचा आदित्य ठाकरेंना सल्ला, “फक्त प्रेमपत्र लिहू नका…”

पहिल्या विशेष प्रवेश फेरीनुसार केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि संस्थात्मक, अल्पसंख्यांक, व्यवस्थापन कोटाअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येतील. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा असल्यास स्वतःच्या लॉगिमधील ‘अपलोड रिक्वॉयर्ड डॉक्युमेंट्स’ या पर्यायावर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करावीत आणि ‘प्रोसिड फॉर ऍडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून संबंधित महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करावा.

शाखानिहाय उपलब्ध जागा आणि निवड झालेले विद्यार्थी

शाखा – उपलब्ध जागा – निवड झालेले विद्यार्थी
कला – २८ हजार ५०७ – ७ हजार २५०
वाणिज्य – १ लाख ३ हजार ४०९ – ४८ हजार १८७
विज्ञान – ६२ हजार ७३१ – ३४ हजार १४५
व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम – ३ हजार १ – ८१८
एकूण – १ लाख ९७ हजार ६४८ – ९० हजार ४००

हेही वाचा :मुंबई: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या एसटी भरल्या

पहिल्या विशेष प्रवेश फेरीअंतर्गतचे प्रवेश पात्रता गुण (तिसऱ्या नियमित फेरीचे पात्रता गुण)

● एच. आर महाविद्यालय, चर्चगेट : वाणिज्य शाखा ९६.६ टक्के (९७.२ टक्के)
● सेंट झेविअर्स महाविद्यालय, फोर्ट : वाणिज्य शाखा ८६.६ टक्के (८८.४ टक्के), विज्ञान शाखा ८७.२ टक्के (९२.०० टक्के)

● के. सी. महाविद्यालय, चर्चगेट : कला शाखा ७२.२ टक्के (८७.८ टक्के), वाणिज्य शाखा ८८.८ टक्के (९१.८ टक्के), विज्ञान शाखा ७३.२ टक्के (८७.६ टक्के)
● जय हिंद महाविद्यालय, चर्चगेट : कला शाखा ७०.६ टक्के (९२.२ टक्के), वाणिज्य शाखा ८८.६ टक्के (९२.०० टक्के), विज्ञान शाखा ७३.६ टक्के (८८.४ टक्के)
● रुईया महाविद्यालय, माटुंगा : कला शाखा ९१.४ टक्के (९३.४ टक्के), विज्ञान शाखा ९२.४ टक्के (९५.४ टक्के)
● पोदार महाविद्यालय, माटुंगा : वाणिज्य शाखा ८६.०० टक्के (९२.०० टक्के)
● रुपारेल महाविद्यालय, माटुंगा : कला शाखा ८३.६ टक्के (८७.०० टक्के), वाणिज्य शाखा ८८.६ टक्के (९०.२ टक्के), विज्ञान शाखा ८९.२ टक्के (९२.४ टक्के)
● एसआयईएस वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, शीव : वाणिज्य शाखा ८२.०० टक्के (८५.८ टक्के)
● साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले : कला शाखा ७६.८ टक्के (८०.८ टक्के), वाणिज्य शाखा ८८.०० टक्के (८९.४ टक्के) , विज्ञान शाखा ८७.०० टक्के (९१.८ टक्के)

● डहाणूकर महाविद्यालय, विले पार्ले : ९०.०० टक्के (९०.२ टक्के)

● भवन्स महाविद्यालय, अंधेरी : कला शाखा ७८.०० टक्के (७८.४ टक्के), वाणिज्य शाखा ८७.६ टक्के (८९.६ टक्के), विज्ञान शाखा ८७.८ टक्के (८९.८ टक्के)

● मिठीबाई महाविद्यालय, विलेपार्ले : कला शाखा ८४.६ टक्के (९०.४ टक्के), वाणिज्य शाखा ८९.६ टक्के (९१.४ टक्के), विज्ञान शाखा ८०.०० टक्के (८९.२ टक्के)

हेही वाचा :मुंबई विद्यापीठातर्फे विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव

● एन. एम. महाविद्यालय, विलेपार्ले : वाणिज्य शाखा ९०.४ टक्के (९५.०० टक्के)

● वझे केळकर महाविद्यालय, मुलुंड : कला शाखा ८८.०० टक्के (९२.२ टक्के), वाणिज्य शाखा ९२.४ टक्के (९२.६ टक्के), विज्ञान शाखा ९१.६ टक्के (९६.२ टक्के)
● मुलुंड वाणिज्य महाविद्यालय, मुलुंड : वाणिज्य शाखा ९१.६ टक्के (९२.८ टक्के)

● बी. एन. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे : विज्ञान शाखा ९१.२ टक्के (९४.२ टक्के)

● सी. एच. एम महाविद्यालय, उल्हासनगर : कला शाखा ३५.६ टक्के (७३.०० टक्के), वाणिज्य शाखा ८३.८ टक्के (८५.६ टक्के), विज्ञान शाखा ८६.२ टक्के (९०.६ टक्के)

● फादर अग्नेल मल्टीपर्पज महाविद्यालय, वाशी : वाणिज्य शाखा ७८.०० टक्के (८६.६ टक्के), विज्ञान शाखा ९१.८ टक्के (९७.६ टक्के)
● सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे : कला शाखा ६५.६ टक्के (६३.०० टक्के), वाणिज्य शाखा ७६.०० टक्के (७७.४ टक्के), विज्ञान शाखा ८१.६ टक्के (८३.०० टक्के)

● बी.के.बिर्ला महाविद्यालय, कल्याण : कला शाखा ८३.८ टक्के (९४.०० टक्के), वाणिज्य शाखा ८७.६ टक्के (९३.२ टक्के), विज्ञान शाखा ९२.४ टक्के (९३.८ टक्के)

Story img Loader